बायकोला प्रियकराच्या मिठीत पाहिलं, नवरा व्यथित, सुसाईड नोट लिहित आयुष्य संपवलं

'घरातून गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी मी पोहोचलो, तेव्हा ती प्रियकराच्या मिठीत झोपली होती. हे दृश्य पाहून मला खूप वाईट वाटलं. जगण्यात मला काही अर्थ वाटत नाही. आता मी माझा जीव देतोय...' असं पतीने लिहिलं आहे

बायकोला प्रियकराच्या मिठीत पाहिलं, नवरा व्यथित, सुसाईड नोट लिहित आयुष्य संपवलं
पतीचा गळफास, पत्नीवर आरोपांचा फासImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 8:36 AM

पाटणा : बिहारमध्ये नात्यांची लक्तरं टांगणारी घटना (Bihar Crime News) समोर आली आहे. पत्नीला तिच्या प्रियकरासोबत (Boyfriend) शय्यासोबत करताना पाहून पती व्यथित झाला. त्यानंतर पतीने गळफास घेऊन जीव दिल्याचं उघडकीस आलं आहे. नालंदा जिल्ह्यातील हा प्रकार घडला. पतीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. पतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन विविध चर्चांना उधाण आलं आहे.

काय आहे प्रकरण?

बिहारमध्ये नालंदा जिल्ह्यातील लहेरी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. चंद्रदेव कुमार या परिसरात कुटुंबासह राहत होता. 2015 मध्ये त्याचे लग्न झाले होते. त्याचा बटाटे आणि कांदा विक्रीचा व्यवसाय होता. 16 मे रोजी त्याने राहत्या घरात गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. पोलिसांनी मृतदेहाजवळून एक सुसाईड नोट जप्त केली, जी वाचून पोलिसही हैराण झाले. पतीने सुसाईड नोटमध्ये पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांचा उल्लेख केला होता.

हे सुद्धा वाचा

सुसाईड नोटमध्ये काय?

पतीने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, ‘घरातून गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी मी पोहोचलो, तेव्हा ती प्रियकराच्या मिठीत झोपली होती. हे दृश्य पाहून मला खूप वाईट वाटलं. जगण्यात मला काही अर्थ वाटत नाही. आता मी माझा जीव देतोय…’ या धक्कादायक घटनेनंतर दोन निष्पाप मुलांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं आहे.

सुसाईड नोटमध्ये चंद्रदेवने पुढे लिहिले आहे की, ‘पत्नीचे तिच्या वर्गमित्राशिवाय अन्य एका तरुणाशी अनैतिक संबंध होते. अनेक वेळा पत्नीला अनेक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुले झाल्यावरही तिला प्रियकराची साथ हवी होती. म्हणूनच मी माझा जीव देत आहे. 8 मे रोजी पत्नी प्रियकराला भेटण्यासाठी घरातून गायब झाली. त्यानंतर मी तिला आणण्यासाठी पोहोचलो. तिथे मी पाहिले की ती तिच्या प्रियकराच्या मिठीत होती. मी त्या आक्षेपार्ह अवस्थेचा उल्लेखही करू शकत नाही. त्यानंतर मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.’

पत्नीवर कारवाईची मागणी

लहेरीचे एसएचओ सुबोध कुमार यांनी सांगितले की, चंद्रदेवने गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याने आपल्या पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्याच्याकडून सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख आहे. सध्या शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उर्वरित अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल. या ठिकाणी मृताच्या भावाने घटनास्थळावरून सापडलेल्या सर्व वस्तू पोलिसांना दिल्या आणि आरोपी महिलेला अटक करण्याची मागणी केली. ती अनेकदा पतीचा छळ करत असे, असे मृताच्या भावाचे म्हणणे आहे

'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.