बायकोला Video Call करुन जवानाची आत्महत्या, बायकोनेही स्वतःला पेटवलं, मोठ्या भावाला हार्ट अटॅक

महेशने बायकोला व्हिडीओ कॉल केला होता. थोडा वेळ दोघांमध्ये बोलणंही झालं, मात्र अकस्मात सारं चित्र पालटलं. नवऱ्याने सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडल्याचं पाहून तिनेही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला

बायकोला Video Call करुन जवानाची आत्महत्या, बायकोनेही स्वतःला पेटवलं, मोठ्या भावाला हार्ट अटॅक
बिहारमध्ये जवानाची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 1:44 PM

पाटणा : बायकोला व्हिडीओ कॉल (Video Call) करुन भारतीय सैन्यातील जवानाने आत्महत्या (Suicide) केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडत जवानाने आयुष्य संपवलं. पतीला डोळ्यांदेखत प्राण सोडताना पाहून पत्नीही उद्विग्न झाली. पत्नीने अंगावर केरोसिन ओतून पेटवून घेत जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बिहारमधील (Bihar Crime) आरा येथे हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला. धक्कादायक म्हणजे भाऊ-वहिनीविषयीचं वृत्त ऐकून मोठ्या दीराला हार्ट अटॅक आला.

एकाच कुटुंबावर दुःखाचे तीन डोंगर

महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी पाटणा पीएमसीएचला नेण्याचा सल्ला दिला आहे. त्याहून वाईट म्हणजे भाऊ-वहिनीची ही स्थिती पाहून मयत जवानाच्या भावालाही हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामुळे त्यालाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे. बिहारमधील आरा येथे उदवंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पियनिया गावात या घटना घडल्या आहेत.

मयत जवानाचं नाव महेश सिंह होतं. तो हैदराबाद 16 बिहार रेजिमेंटमध्ये नायक पदावर तैनात होता. त्याच्या पत्नीचं नाव गुडिया देवी आहे. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण अस्पष्ट

महेशचा मोठा भाऊ जयनाथ सिंह याला हार्ट अटॅक आला. त्याच्यावर पाटण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांनी टोकाचं पाऊल उचलण्याचं नेमकं कारण काय, पती-पत्नीमध्ये कुठल्या कारणावरुन वाद झाला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.

व्हिडीओ कॉलवर आत्महत्या

रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास महेशने बायकोला व्हिडीओ कॉल केला होता. थोडा वेळ दोघांमध्ये बोलणंही झालं, मात्र अकस्मात सारं चित्र पालटलं. नवऱ्याने सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडल्याचं पाहून तिनेही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. महेश काही दिवसांपासून तणावात होता. गुडिया त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती, असं काही जण म्हणतात.

महेश-गुडिया यांना 15 वर्षांची मुलगी, तर 14 आणि 12 वर्षांची दोन मुलं आहेत. या घटनेविषयी अद्याप मुलं आणि महेशच्या वृद्ध वडिलांना माहिती देण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या :

आठवीपासून रिलेशनशीपमध्ये, एका भांडणाने सारं उद्ध्वस्त, गर्लफ्रेण्डच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही स्वतःला संपवलं

बाबा माफ करा, मी तुमचं स्वप्न… वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

चार लग्नं मोडली, पाचवी बायको दागिन्यांसह पळाली, उद्विग्न तरुणाची आत्महत्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.