Bihar Murder | रात्री धूमधडाक्यात बर्थडे पार्टी, दुसऱ्या सकाळी गोळी झाडून हत्या, एकुलत्या एक मुलाचा खून का?
हत्येची ही घटना मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरूप समइल गावातील आहे. वरुण तिवारी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुन्हेगारांनी घरात घुसून वरुणची हत्या केल्याचा आरोप आहे.
पाटणा : बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात हत्येची (Bihar Crime News) खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाने चार मे रोजी धुमधडाक्यात वाढदिवसाची पार्टी केली होती. त्यानंतर अवघ्या एका दिवसात म्हणजे पाच मे रोजी रात्री त्याची गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा तरुण त्याच्या मामाकडे राहत होता. त्याच्या मामाला मूलबाळ नव्हते. वस्तीतील लोकांनी मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने तरुणाची हत्या केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. हा तरुण त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मुलाच्या हत्येची माहिती मिळाल्याने तरुणाच्या पालकांची अवस्था बिकट झाली आहे. रडून त्यांची अवस्था वाईट झाली आहे. घरात शोकाकुल शांतता पसरली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन हत्येचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्येची ही घटना मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरूप समइल गावातील आहे. वरुण तिवारी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुन्हेगारांनी घरात घुसून वरुणची हत्या केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
वरुणच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या एका दिवसानंतर ही हत्या करण्यात आली आहे. चार मेच्या रात्री वरुणने बर्थडे पार्टी मोठ्या धूम धडाक्यात साजरी केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 मे 2022 च्या रात्री गुन्हेगारांनी वरुणच्या घरात घुसून त्याची हत्या केली. पोलिस आले तेव्हा खोलीत मृतदेह पडलेला होता आणि मृताच्या चप्पल बाहेर होत्या.
एकुलता एक मुलगा गेला
वरुण तिवारी हा हथुआ पोलीस स्टेशन परिसरातील कांध गोपी येथील रहिवासी बादशाह तिवारी यांचा एकुलता एक मुलगा होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण गौरूप समाईल गावात त्याचे वृद्ध मामा सुरेंद्र दुबे यांच्यासोबत राहत होता. त्यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे वरुण त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्याकडेच राहायचा. या हत्येमध्ये शेजारच्या लोकांचा हात असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. मामाची मालमत्ता हडप करण्यासाठी त्यांना अनेकदा त्रास देतात. मात्र, हत्येचे नेमके कारण पोलिसांना समजू शकले नाही.
वृद्ध दाम्पत्याची मालमत्ता हडप करण्याचा रचतोय?
हथुआचे एसडीपीओ नरेश कुमार यांनी सांगितले की, पोलीस तरुणाच्या हत्येतील प्रत्येक मुद्द्याचा तपास करत आहेत. एफएसएलच्या टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या खोलीत रक्तरंजित घटना घडली ती खोली पोलिसांनी सील केली आहे. यासोबतच पोस्टमॉर्टममध्ये सापडलेली गोळीही फॉरेन्सिक लॅब तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. वरुण तिवारीची घरात घुसून हत्या कोणी केली, हा पोलिसांसमोर मोठा प्रश्न आहे. वृद्ध दाम्पत्याची मालमत्ता हडप करण्याचा डाव कोण रचतोय? वाढदिवसाच्या पार्टीतच खुनाचा कट होता का? असे सवाल उपस्थित झाले आहेत.
संबंधित बातम्या
वाशिममध्ये पुजाऱ्याचा खून, उमरा दुर्गा मंदिरातील घटना; धारधार शस्त्राने भोसकले
आजी-आजोबांच्या अपमानाचा सूड, नातवाने असा काढला तरुणाचा काटा
दोन दिवसापूर्वीच्या हत्येचे गूढ उकलण्यास नागपूर पोलिसांना यश, चोरीच्या उद्देशाने घडली घटना