AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्लज्जपणाचा कळस! अखेरच्या घटका मोजणाऱ्या नवऱ्यासमोरच महिलेचा कम्पाऊण्डरकडून विनयभंग

पतीवर उपचार करणाऱ्या 'देवमाणूस' डॉक्टरने अरेरावी केली, तर कम्पाऊण्डरने आपल्या अब्रूला हात घातल्याचा आरोप महिलेने केला आहे (Wife Molested by Compounder )

निर्लज्जपणाचा कळस! अखेरच्या घटका मोजणाऱ्या नवऱ्यासमोरच महिलेचा कम्पाऊण्डरकडून विनयभंग
चारित्र्याच्या संशयावरुन वकिल महिलेची हत्या; पतीला जन्मठेप, सासऱ्याला सक्तमजुरी
| Updated on: May 11, 2021 | 12:50 PM
Share

पाटणा : एखाद्याच्या असहाय्यतेचा किती गैरफायदा उचलावा, याचं ज्वलंत उदाहरण बिहारमध्ये पाहायला मिळत आहे. अखेरच्या घटका मोजणाऱ्या कोरोनाग्रस्त नवऱ्यासमोरच त्याच्या पत्नीचा कम्पाऊण्डरने विनयभंग केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही, तर डॉक्टरनेही आपल्या पतीच्या बाबतीत हलगर्जी केल्याचा दावा पीडितेने केला आहे. (Bihar Crime Wife allegedly Molested by Compounder in front of Husband on Death Bed)

कोरोनाची दुसरी लाट देशभर पसरली असताना बिहारमधील महिलेने खासगी रुग्णालयांवर उपस्थित केलेले प्रश्न सर्वांनाच अंतर्मुख करणारे आहेत. पतीवर उपचार करणाऱ्या ‘देवमाणूस’ डॉक्टरने अरेरावी केली, तर कम्पाऊण्डरने आपल्या अब्रूला हात घातल्याचा आरोप महिलेने केला आहे. पाटण्यातील भागलपूरमध्ये ही खळबळजनक घटना घडली.

सॉफ्टवेअर इंजिनिअरला कोरोनाची लागण

मधुबनीमध्ये राहणारी पीडिता आपल्या पतीसह होळी साजरा करण्यासाठी नोएडाहून भागलपूरला आली होती. 17 एप्रिलला पीडितेच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर नवऱ्याला कोरोनाची लागण झाली. आरटीपीसीआर तपासात पतीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, मात्र छातीचा सिटी स्कॅन केला असता, फुफ्फुसांमध्ये 60% संक्रमण असल्याचं समोर आलं. त्यानंतर पीडितेने त्याला ग्लोकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

डॉक्टरांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शन सांडल्याचा आरोप

ग्लोकल रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारा घटनाक्रम सुरु झाला. रुग्णालयात पतीला पाहण्यासाठी डॉक्टर केवळ 10 मिनिटं यायचे, असा दावा पीडितेने केला आहे. डॉक्टरांनी आपल्याला रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणण्यास सांगितलं होतं. महत्प्रयासाने तिने औषध शोधून आणलं. मात्र डॉक्टरांनी अर्ध इंजेक्शन खाली सांडवल्याचा आरोप महिलेने केला आहे.

‘मी खूप मुश्किलीने हे महागडं इंजेक्शन मिळवलं आहे. कृपया ते वाया घालवू नका’ अशी याचना तिने डॉक्टरांकडे केली. त्यावर ’50 हजारांचं इंजेक्शन जरी सांडलं असतं, तरी तू काहीच करु शकली नसतीस’ असं उलट डॉक्टरांनीच तिला दटावलं. (Wife Molested by Compounder )

कम्पाऊण्डरकडून पतीसमोरच अब्रूला हात

डॉक्टरांची वर्तणूक फिकी पडेल, असं असभ्य वर्तन ग्लोकल हॉस्पिटलच्या वॉर्ड कंपाउंडर आणि वार्ड अटेंडेंट ज्योतीकुमार याने केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. मला आपल्या पतीजवळ थांबू द्या, अशी गयावया मी ज्योतीकुमारकडे केली होती. त्यावर त्याने मदत करण्याचं आश्वासन दिलं. मात्र मी नवऱ्याच्या बेडजवळ उभी असताना त्याने माझी ओढणी खेचली. मी मागे वळले, तोच ज्योतीकुमारने माझ्या कंबरेवर हात नेल्याचं मला दिसलं. मी त्याच्याकडे रागाने पाहिलं. माझे पती हतबलपणे हे दृश्य पाहत होते. तर तो निर्लज्जपणे हसत होता, असा आरोप पीडितेने केला आहे.

संबंधित बातम्या :

25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, नागपुरात वरिष्ठ डॉक्टरला बेड्या

कृत्रिम श्वासावर जगणाऱ्या विवाहितेकडे पाहूनही वासना चाळवली, कोव्हिड सेंटरमध्ये बलात्काराचा प्रयत्न

(Bihar Crime Wife allegedly Molested by Compounder in front of Husband on Death Bed)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.