पहिली पत्नी असताना प्रेयसीसोबत दुसरा विवाह केला, मग तीन महिन्यातच जे घडलं ते पाहून सर्वच हादरले !

पहिली पत्नी असताना दुसरीशी प्रेमविवाह केला. पण तीन महिन्यातच दुसऱ्या विवाहाचा धक्कादायक अंत झाला. महिलेसोबत जे घडलं त्याची तिने कधी कल्पनाही केली नसेल.

पहिली पत्नी असताना प्रेयसीसोबत दुसरा विवाह केला, मग तीन महिन्यातच जे घडलं ते पाहून सर्वच हादरले !
कौटुंबिक वादातून भावाने भावाला संपवले
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 12:16 PM

पटना : बिहारमध्ये एक हत्याकांडाची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरगुती भांडणातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना पटनामध्ये घडली आहे. पहिला विवाह झाला असतानाही एका तरुणाने एका तरुणीशी प्रेमसंबंध जोडले. मग दोघांनी लग्नही केले. सर्व सुरळीत सुरु होते. पण लग्नाच्या तीन महिन्यांनतर अखेर पत्नीला पतीचे सत्य कळले. मग दोघांमध्ये भांडण होऊ लागले. याच भांडणातून पतीने दुसऱ्या पत्नीची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह गंगा नदीत फेकला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. उमेश पासवान असे आरोपीचे नाव आहे. तर सुनीता असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

मोठ्या वहिनीसोबत झाला होता उमेशचा पहिला विवाह

उमेशच्या भावाचे सहा वर्षापूर्वी निधन झाले. यानंतर उमेशने वहिनीसोबत विवाह करत भावाच्या तिन्ही मुलांचीही जबाबदारी घेतली. मात्र उमेशचे पटना येथे सुनीताशी प्रेमसंबंध जुळले आणि त्याने तिच्याशी प्रेमविवाह केला. आपल्या पहिल्या लग्नाची माहिती सुनीतापासून लपवून ठेवली होती. मात्र लग्नाच्या तीन महिन्यांनी तिला ही बाब कळली. यानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले. सुनीता उमेशवर वहिनीला सोडण्यासाठी दबाव टाकत होती.

हत्येनंतर मृतदेह गंगा नदीत फेकला

याच वादातून उमेशने तिची हत्या केली आणि मृतदेह रिक्षातून नेत गंगा नदीत फेकला. यानंतर उमेश थेट आपल्या गावी वहिनीकडे गेला. सुनीताच्या माहेरचे तिला फोन करत होते. मात्र तिचा फोन बंद येत होता. खूप प्रयत्न करुनही माहेरच्यांचा सुनीताशी संपर्क होत नव्हता. अखेर सुनीताच्या घरचे तिच्या भाड्याच्या घरात गेले तर दरवाजा बंद होता. यादरम्यान त्यांची उमेशच्या वहिनीशी भेट झाली. त्यांनी तिच्याकडे सुनीताबाबत चौकशी केली असता, ती कुठेतरी निघून गेल्याचे तिने सांगितले.

हे सुद्धा वाचा

सुनीताच्या घरच्यांना काहीतरी वाईट घडल्याचा संशय आला. त्यांनी थेट जक्कनपूर पोलीस ठाणे गाठत पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी बेपत्ता सुनिताचा शोध सुरु केला असता हत्यांकाडाचा उलगडा झाला. यानंतर पोलिसांनी आरोपी उमेशला अटक केली. मृतदेह नेण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.