तिला शिक्षिका बनायचे होते, पण त्याच्या मनात काही वेगळेच होते; मग जे घडले त्याने सर्वच हादरले !

तिला शिक्षिका बनून विद्यार्थी घडवायचे. मात्र हे स्वप्नच तिच्यासाठी घातक ठरले. वारंवार शिक्षकाच्या परीक्षा देण्यासाठी पती आणि सासरच्यांकडे हट्ट करत होती. पण पुढे जे घडले ते भयंकर.

तिला शिक्षिका बनायचे होते, पण त्याच्या मनात काही वेगळेच होते; मग जे घडले त्याने सर्वच हादरले !
तिला शिक्षिका व्हायचे होते पण...Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 8:05 PM

वैशाली : बिहारमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वैशाली जिल्ह्यात एका विवाहितेची पती आणि सासरच्यांनी मिळून क्रूर हत्या केली. तिची चूक एवढीच होती की, तिला शिक्षिका व्हायचे होते. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. विवाहितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

तिला शिक्षिका व्हायचे होते

जलालपूर येथील पिंकी कुमारी हिचा विवाह मझौली गावातील रहिवासी गुड्डू कुमार याच्याशी 2022 मध्ये झाला होता. पिंकी कुमारी हिला शिक्षिका व्हायचे होते. ती नर्सरी टीचर ट्रेनिंग घेत होती. तिला पहिल्या सत्रात चांगले गुण मिळाले होते आणि दुसऱ्या सत्रात प्रवेश घ्यायचा होता. याबाबत पिंकी पती आणि सासरच्यांशी बोलायची तेव्हा ते तिला शिवीगाळ करायचे आणि तिच्याशी भांडणही करायचे.

परिक्षेला बसण्यासाठी हट्ट करत होती म्हणून बेदम मारले

शिक्षकाच्या ट्रेनिंगसाठी दुसऱ्या सत्राच्या परिक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 10 एप्रिल शेवटची तारीख होती. जसजशी तारीख जवळ येत होती, पिंकी पती आणि सासरच्यांकडे परिक्षेला बसण्यासाठी हट्ट करत होती. यातूनच पती आणि सासरच्यांनी तिला बेदम मारहाण केली. महिलेच्या माहेरच्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ मुलीच्या सासरी धाव घेतली. मात्र तेथे जाताच मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे त्यांना कळले.

हे सुद्धा वाचा

याबाबत तपास करत असताना पैशावरुन भांडण झाल्याची माहितीही समोर येत आहे. याप्रकरणी महिलेच्या माहेरच्या लोकांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतरच पोलीस पुढील कारवाई करतील.

'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.