ब्युटी पार्लरमध्ये तयार होत होती नवरी, मात्र बोहल्यावर चढण्याआधीच रुग्णालयात पोहचली, कारण काय?

ज्या दिवसाची वर-वधू आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस अखेर उजाडला होता. लग्नाचा मंडप सजला, नातेवाईकक जमले. काही वेळात नवरदेव वरात घेऊन वधूच्या दारात येणार इतक्यात जे घडलं ते भयंकर.

ब्युटी पार्लरमध्ये तयार होत होती नवरी, मात्र बोहल्यावर चढण्याआधीच रुग्णालयात पोहचली, कारण काय?
पोलीस कॉन्स्टेबल प्रियकराकडून प्रेयसीवर गोळीबारImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 5:37 PM

मुंगेर : बिहारमधील मुंगेरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका तरुणीचे लग्न होते. वरात येणारच होती. यासाठी तरुणी ब्युटी पार्लरमध्ये तयारी करण्यासाठी गेली. मात्र नवरदेवाच्या गळ्यात वरमाला घालण्याआधीच तरुणीवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. ब्युटी पार्लरमध्ये एक नवरी मेकअपसाठी बसली असतानाच तरुणीवर गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ माजली. गोळी मारणारा पोलीस कॉन्स्टेबल होता. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अमन कुमार असे आरोपी कॉन्स्टेबलचे नाव आहे.

लग्नासाठी तयार होत होती तरुणी

पीडित तरुणी आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते. मात्र तरुणीचे दुसऱ्याच मुलाशी लग्न ठरले. यामुळे कॉन्स्टेबल नाराज होता. रविवारी तरुणीचा विवाह होता. लग्नासाठी तरुणी मेकअप करायला ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. यावेळी आरोपी पार्लरमध्ये घुसला आणि त्याने तरुणीवर गोळी झाडली. पण ही गोळी तरुणीच्या खांद्याला लागल्याने ती जखमी झाली. यानंतर आरोपीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातून बंदूक खाली पडली. यानंतर पार्लरमधील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले, मात्र त्यांना धक्काबुक्की करत आरोपी तेथून पळून गेला.

ऐन लग्नाच्या दिवशी गोळीबार

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. ऐन लग्नाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वच हादरले. रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पार्लरमधील कर्मचारी गोंधळले.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.