अधिकाऱ्याच्या बायकोचा बहिणीच्या नवऱ्यावर जीव जडला, मग सगळ्यांसमोरच तिची धक्कादायक कृती

अधिकाऱ्याच्या बायकोचा भाऊजीवर जीव जडला. त्याला अजिबात असं वाटलं नव्हतं. बीडीओ आबिद हुसैन 5 ऑगस्टला घरी पोहोचला, तेव्हा त्याने पाहिलं साडू तिथे होता.

अधिकाऱ्याच्या बायकोचा बहिणीच्या नवऱ्यावर जीव जडला, मग सगळ्यांसमोरच तिची धक्कादायक कृती
extramarital affair
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 11:53 AM

पाटना : एका BDO साहेबांच्या बायकोचा आपल्या भाऊजीवर जीव जडला. मॅडमनी खुल्लम खुल्ला आपल्या प्रेमाची कबुली दिली. आत जगणं-मरणं भाऊजीसोबतच असं तिने जाहीर केलं. पत्नीच हे रुप पाहून BDO अवाक झाला. त्याला मोठा धक्का बसला. पत्नी पतीसमोरच घरातून 6 लाख रुपयाचे दागिने घेऊन गायब झाली. BDO च्या बायकोचा बहिणीच्या नवऱ्यावर जीव जडला. BDO ने तिला भाऊजीसोबत जाण्यापासून रोखलं, त्यावेळी दोघांनी मिळून BDO ला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर BDO ने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

बिहारच्या सीतामढीमधील नानपुर प्रखंडमधील हे प्रकरण आहे. BDO आबिद हुसैनची पत्नी भाऊजीच्या प्रेमसाठी लग्नाच पवित्र नातं विसरली. ही प्रेम कथा सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

कधी झालेली पोस्टिंग?

नानपुर प्रखंडमध्ये मागच्या 20 जुलैला आबिद हुसैनची पोस्टिंग झाली होती. अजून त्याने इथे व्यवस्थित कामकाज संभाळल सुद्धा नव्हतं. तितक्यात मोठी घरगुती समस्या निर्माण झाली. आपल्या आयुष्यात असं काही होईल, याची BDO ने अजिबात कल्पना केली नव्हती. पत्नी जाहीरपणे प्रेमाची कबुली देऊन प्रियकरासोबत सगळ्यांसमोर निघून जाईल असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं. बीडीओ आबिद हुसैन 5 ऑगस्टला घरी पोहोचला, तेव्हा साडू तिथे हजर होता. अचानक साडूला पाहून तिथे धक्का बसला.

‘मला निजामसोबत रहायचय’

काहीवेळाने BDO ची बायको तिथे आली. पत्नी नसरीनने आपण यापुढे भाऊजीसोबतच राहणार असं तिने सर्वांसमोर जाहीर केलं. पुढच आयुष्य मला निजामसोबत घालवायचय असं तिने सांगितलं. पत्नीच्या तोंडून हे शब्द ऐकून BDO आबिद हुसैनला धक्का बसला. त्याच्या पायखालची जमीन सरकली. नसरीनला सगळ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती आपल्या निर्णयावरुन अजिबात मागे हटली नाही. नसरीनने उलट हुंड्यासाठी छळ केला म्हणून तक्रार दाखल करण्याची धमकी दिली व नवऱ्याला मारहाण केली. त्यानंतर ती घरात ठेवलेले 6 लाख रुपये आणि सोनं घेऊन निघून गेली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.