कारच्या बोनेटवर बर्थडे पार्टी, तरूणाने बंदुकीने कापला केक; Video व्हायरल

वाढदिवसाचे सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने केले जाते. एका व्हिडीओत तर एक तरूण कारच्या बोनेटवर उभा राहून केक कापत होता, ते देखील बंदुकीने... हा व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली.

कारच्या बोनेटवर बर्थडे पार्टी, तरूणाने बंदुकीने कापला केक; Video व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 12:14 PM

पाटणा : आजकाल वाढदिवसाचे सेलिब्रेशन विविध (birthday celebration) पद्धतीने केले जाते. तरूणांचा तर उत्साह काही वेगळाच असतो. याचदरम्यान वाढदिवसाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरूण बंदुकीने केक (cake cutting with weapon) कापत असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे तर मित्रांच्या गराड्यात असलेला तो युवक चक्क त्याच्या कारच्या बोनेटवरही (car bonnet) उभा होता. बंदुकीच्या सहाय्याने त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल तीन केक कापले. यावेळी तिथे बरीच गर्दीही होती. हा व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली.

बिहारच्या जहानाबाद येथील असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. खरंतर, बिहारमध्ये सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर किंवा परवानाकृत शस्त्रे दाखवणे, किंवा गोळीबार करणे यावर निर्बंझ लावण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही लोकं कायद्याते पालन न करता अशी कृत्य करत असल्याने वाढदिवसाचा हा व्हिडीओदेखील चर्चेचा विषय ठरला आहे. काही लोकं तर कायदा बाजूला ठेवून शस्त्रं उगारतात आणि आनंदाने गोळीबार करतात. बिहारमध्ये दरवर्षी गोळीबारात अनेक लोकांचा बळी जातो.

ती बंदूक खरी नव्हे, टॉय एअर पिस्तुल

त्या तरुणाने पिस्तुलाने केक कापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत या प्रकरणाचा तपास केला. त्यावेळी असता ती बंदूक खरी नसून टॉय एअर पिस्तूल असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे, 5 जुलै रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत, एक तरुण गाडीच्या बोनेटवर चढून शस्त्राने केक कापताना दिसत आहे. यानंतर पोलिसांना तपास करण्याची सूचना देण्यात आली. व्हिडीओमध्ये तो तरूण ज्या शस्त्राने केक कापत आहे ती खरी बंदूक नसून टॉय एअर पिस्तूल आहे. त्या पिस्तुलाने जीवाची अथवा मालमत्तेची हानी होऊ शकत नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

गोळीबाराच्या बऱ्याच घटना

पुरावा म्हणून पोलिसांनी ते टॉय एअर पिस्तूल ताब्यात घेत त्याचा फोटोही जारी केला आहे. दरम्यान बिहारमध्ये लग्न आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आनंदाच्या भरात बऱ्याच वेळेस फायरिंग होताना दिसते. यामध्ये काही वेळी निरपराधांचा जीवही जातो.

बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.