AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Crime : पिस्तुलाशी खेळता खेळता दाबला ट्रिगर, भाजप नेत्याच्या मुलाकडून 11 वर्षाच्या मुलाचा मर्डर

माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, हे प्रकरण करारी पोलीस ठाण्यातील अशोक नगर येथील आहे. या धक्कादायक घटनेने सध्या उत्तर प्रदेशात खळबळ माजली आहे.

UP Crime :  पिस्तुलाशी खेळता खेळता दाबला ट्रिगर, भाजप नेत्याच्या मुलाकडून 11 वर्षाच्या मुलाचा मर्डर
पिस्तुलाशी खेळता खेळता दाबला ट्रिगर, भाजप नेत्याच्या मुलाकडून 11 वर्षाच्या मुलाचा मर्डरImage Credit source: Social media
| Updated on: Jul 31, 2022 | 3:09 PM
Share

उत्तर प्रदेश – पिस्तुल, चाकू, सुरा यांचं लहान मुलांना खास आकर्षण असतं. मात्र हे आकर्षणच उत्तर प्रदेशात एका भाजप नेत्याला (BJP Leader Sanjay Jaiswal), त्याच्या मुलाला आणि एका निष्पापाला महागात पडलं आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Firing) कौशांबी येथे पिस्तुलाशी खेळत खेळत झालेल्या गोळीबारात एका निष्पापाचा मृत्यू (Young Boy Death) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की भाजप नेत्याच्या घरी काही मुलं गेम खेळत होती, तेव्हा अचानक जवळच ठेवलेल्या परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळीबार झाला. गोळी थेट एका निष्पाप मुलाच्या छातीत लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, हे प्रकरण करारी पोलीस ठाण्यातील अशोक नगर येथील आहे. या धक्कादायक घटनेने सध्या उत्तर प्रदेशात खळबळ माजली आहे.

चोर-शिपाईचा खेळ महागात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय जयस्वाल यांचे करारी पोलिस स्टेशन हद्दीतील अशोक नगर परिसरात घर आहे. येथे सायंकाळी 6 वाजता शेजारी रामेश्वर प्रसाद यांचा 11 वर्षांचा मुलगा अनंत वर्मा हा जैस्वाल यांच्या मुलासोबत चोर-शिपाई खेळत होता. यावेळी परिसरातील इतर काही मुलेही उपस्थित होती.

नमकी कशी गोळी झाडली गेली?

घरात एकही मोठा व्यक्ती उपस्थित नव्हता. त्यामुळे मुलं खेळता खेळता खोलीत पोहोचली. खोलीत भाजप नेत्याचे लोडेड पिस्तूल ठेवण्यात आले होते. जैस्वाल यांच्या मुलाने खेळताना पिस्तुलाने गोळी झाडली. गोळी थेट समोर उभ्या असलेल्या अनंत वर्मा नावाच्या मुलाच्या छातीत लागली आणि अनंत तिथेच पडला आणि त्याला त्रास होऊ लागला. घाबरलेल्या मुलांनी सर्व प्रकार अनंतच्या आईला सांगितला. अनंतची आई ओरडत घटनास्थळाकडे धावली. त्याला पाहताच इतर लोकही तेथे पोहोचले. कुटुंबीयांनी अनंतला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

माहिती मिळताच एएसपी समर बहादूर आणि मंडळ अधिकारी योगेंद्र कृष्ण नारायण पोलीस ताफ्यासह जिल्हा रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी घटनेबाबत नातेवाइकांकडे चौकशी करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे, तसेच या प्रकरणाचा पुढील तपासही सुरू आहे. उत्तर प्रदेशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरही अनेकदा प्रश्नचिन्हं उपस्थित राहिले आहेत. उत्तर प्रदेशात अनेक नेत्यांकडून हत्यारेही आहेत. मात्र ही हत्यारं नीट न हाताळल्यास आणि लहान मुलांच्या हातात पडल्यास किती महागात पडू शकतं, हे दाखवून देणाराच हा प्रकार आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.