Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rape Case | “नोकरीचं आमिष दाखवून अत्याचार, आता ‘तो मी नव्हेचं'”, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्यातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावरुन ठाकरे सरकारवर सडकून टीका केलीय.

Rape Case | नोकरीचं आमिष दाखवून अत्याचार, आता 'तो मी नव्हेचं', चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 1:23 AM

मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्यातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावरुन ठाकरे सरकारवर सडकून टीका केलीय. “राज्यात 60 वर्षांच्या आजीपासून 3 वर्षांच्या छकुलीपर्यंत अत्याचाराचं सत्र सुरु आहे. यातून सरकारच्या महिला सुरक्षेच्या मोठ्या बाता पोकळ वासाच निघाल्या आहेत,” असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं. त्यांनी आज दिवसभरात राज्यातील विविध महिला अत्याचाराच्या घटनांचा संदर्भ घेत सरकारवर सडकून टीका केली (BJP leader Chitra Wagh criticize Thackeray Government over Women atrocities in maharashtra).

चित्रा वाघ म्हणाल्या, “औरंगाबादच्या घटनेमध्ये जे आम्ही म्हणतोय आणि सरकारकडे मागणी करतोय तिच मागणी विधानपरिषदेच्या सन्माननीय उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी केलीये. पीडितेला नोकरीचं आमिष दाखवून अत्याचार केला आणि आता “तो मी नव्हेचं” म्हणत पीडिता आणि तिच्या परीवारावर दबाव आणला जात आहे. एव्हढचं नाही तर पोलिसांकडून या प्रकरणात बी समरी रिपोर्ट होण्याची शक्यता नाकारतां येत नाही. ही शक्यताही निलम गोऱ्हेंनी वर्तवली आहे. आता तरी शासन नियमानुसार कारवाई करणार की अजुनही आरोपीला पाठीशी घालणार?”

दरम्यान, चित्रा वाघ यांनी आज (30 डिसेंबर) दिवसभरात राज्यातील महिला अत्यारावरील घटनांविषयी ट्विटची मालिकाच केली. यात केलेल्या 3 ट्विटमध्ये त्यांनी सरकारच्या महिला सुरक्षेच्या दाव्यावर सडकून टीका केली.

आपल्या पहिल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या, “लातूर-अहमदपूर येथे 60 वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना घडली. तिने नदीत आत्महत्या करत स्वत:ला संपवलं. राज्यात बलात्काऱ्यांना “शक्ती” देण्याचं काम सरकार करतंय. त्यामुळे या विकृतांचे मनोबल वाढलेलं दिसतयं. तक्रार आल्यावर लगेच मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत, ना की तपास आणि चौकशीच्या नावाखाली अभय दिलं जावं.”

‘विकृतांना पाठीशी घालायची शासनाची भूमिका’

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी रायगडमधील पेणच्या घटेवर प्रतिक्रिया दिली. “रायगडमधील पेणमध्ये 3 वर्षीय छकुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. आरोपी जामिनावर बाहेर आलेला होता. याआधीही पॉक्सोच्या केसमध्ये आरोपी जेलमध्ये होता. विकृती फोफावतीये पण तिला जेरबंद करायला शासन कमी पडतंय हे नक्की. कायदे आणताय, पण त्याची प्रभावी अंमलबजावणी करतांना मात्र विकृतांना पाठीशी घालायची शासनाची भूमिका आहे,” असा आरोप वाघ यांनी यात केला.

तिसऱ्या ट्विटमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या, “पुणे-जुन्नर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घृणास्पद घटना घडली. आरोपी अद्याप फरार आहेत. आजचं माझं हे 3 रं ट्वीट जे टाईप करतांनाही मला अतीव वेदना होताहेत. 60 वर्ष आजीपासून 3 वर्षांच्या छकुलीपर्यंत अत्याचाराचं सत्र सुरूच आहे. सरकारच्या महिला सुरक्षेच्या मोठ्या बाता पोकळ वासाच निघाल्या.”

हेही वाचा :

मेहबूब शेख प्रकरणाला नवं वळण, आधी बलात्काराचा आरोप, आता पोलिसांकडून मोठा खुलासा

Rape Case | राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले, नार्को टेस्टचीही तयारी

अडीच वर्षाच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या, जामिनावर सुटलेल्या आरोपीचं दुष्कृत्य

BJP leader Chitra Wagh criticize Thackeray Government over Women atrocities in maharashtra

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.