बॉडी बिल्डर मुलाकडून आई-वडिलांवर हल्ला, हल्ल्यानंतर तरुण फरार, कारण काय?

तरुण मुलगा वृद्ध आई-वडिलांचा आधार असतो. पण हाच मुलगा आई-वडिलांसाठी काळ ठरल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे.

बॉडी बिल्डर मुलाकडून आई-वडिलांवर हल्ला, हल्ल्यानंतर तरुण फरार, कारण काय?
बॉडी बिल्डर मुलाकडून आई-वडिलांवर हल्लाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 7:22 PM

ठाणे : ठाणे शहरात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. एका बॉडी बिल्डर असलेल्या मुलाने आपल्या आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ठाण्यातील कासारवडवली परिसरात घडली आहे. या घटनेत आई वडील दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. संकल्प भाटकर असे 35 वर्षीय आरोपी तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर तरुण फरार झाला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आई-वडिलांवर हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला

ठाणे पश्चिम येथील कासारवडवली परिसरात विहंग व्हॅली इमारतीत आज सकाळी 11.15 च्या सुमारास ही घटना घडली. संकल्प भाटकर हा तरुण आपल्या आई-वडिलांसोबत येथे राहतो. आज सकाळी त्याने आपल्या आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. हल्ल्याचे कारण अद्याप समजले नाही. यानंतर तो आपल्या बाईकवरुन पळून गेला.

कासारवडवली पोलिसांकडून लुकआऊट नोटीस जारी

घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी वृद्ध जोडप्याला रुग्णालयात दाखल केले. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संकल्प हा बॉडी बिल्डर आहे आणि तो स्टेरॉईड्स घेत असे. तसेच तो सायको आहे. यानंतर पोलिसांनी संकल्प भाटकरसाठी लुकआउट परिपत्रक काढले आहे. आरोपीजवळ कांदा कटर आहे. संकल्प कुठेही दिसल्यास पोलिसांना त्वरीत कळवण्याचे आवाहन कासारवडवली पोलिसांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.