हातावर त्रिशुल आणि ओमचा टॅटू, सुमद्रकिनारी आढळलेला ‘तो’ शीर नसलेला मृतदेह कुणाचा?

समुद्र किनाऱ्यावर सकाळी एक बॅग वाहून आली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बॅग उघडून पाहिली तर आतील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.

हातावर त्रिशुल आणि ओमचा टॅटू, सुमद्रकिनारी आढळलेला 'तो' शीर नसलेला मृतदेह कुणाचा?
भाईंदर समुद्र किनारी महिलेचा मृतदेह आढळलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 4:16 PM

भाईंदर : समुद्र किनाऱ्यावर शीर नसलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात उत्तन पातान बंदर येथे समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी सकाळी मृतदेह आढळला. एल्फा कंपनीच्या ट्रॅव्हल बॅगेत महिलेचा मुंडकं नसलेला मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवत, पुढील तपास सुरू केला. मृत तरुणीच्या हातावर त्रिशूल आणि ओमचा टॅटू बनवला आहे. मृत तरुणीचे वय 25 ते 30 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदक करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरु

मृतदेह असलेली बॅग पाण्यात वाहून आलेली असून, नेमकी कुठून आली आहे याचा तपास पोलीस घेत आहेत. महिलेच्या हत्येमागील कारण काय?, हत्या कोणी आणि कुठे केली? याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत. लवकरात लवकर हत्या करणाऱ्याचा शोध घेतला जाईल, असे उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वपोनी कारंडे यांनी सांगितले. दरम्यान, कुणाच्या कुटुंबातील 25 ते 30 वर्षीय महिला मिसिंग असल्यास त्यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्यास संपर्क साधावा, असे आवाहन देखील उत्तन सागरी पोलिसांच्या मार्फत करण्यात आले आहे.

जुन्नरमध्ये डोंगरावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

जुन्नर तालुक्यातील बेल्हेजवळील पेमदरा येथे डोंगरावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे आहे. प्रकरणाची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सध्या आळेफाटा पोलिसांकडून सुरू आहे. व्यक्तीची हत्या कोणी केली याबाबत आळेफाटा पोलीस तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.