AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरमध्ये हत्यासत्र थांबण्याचे नाव घेईना, केडगावमध्ये अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ

नगरमध्ये हत्यासत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. रोजच्या हत्येच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नगरमध्ये हत्यासत्र थांबण्याचे नाव घेईना, केडगावमध्ये अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ
जमिनीच्या वादातून पुतण्याने काकाला संपवले
| Updated on: Jun 29, 2023 | 2:59 PM
Share

अहमदनगर : नगरमध्ये हत्येच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. एकामागोमाग एक हत्येच्या घटनांनी जिल्हा हादरुन गेला आहे. नगर शहरातील केडगाव उपनगरमध्ये अज्ञात व्यक्तीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. केडगाव देवी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर एका वीट भट्टीजवळ पस्तीस वर्षीय इसमाचा मृतदेह सापडला. या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतहेद ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात खुनाच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

पोलिसांकडून सखोल तपास सुरु

मयताची ओळख पटवण्याचे काम कोतवाली पोलीस करत आहेत. मयताची ओळख पटल्यानंतर ही हत्या कुणी केली आणि कोणत्या कारणातून केली याचा शोध घेणं पोलिसांसाठी सोप्पं होईल. कोतवाली पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. तपासाअंती सर्व स्पष्ट होईल.

हत्याकांडाने नगर हादरले

अहमदनगर जिल्ह्यात एकापाठोपाठ खुणाच्या घटनेत मोठ्या संख्येने वाढ होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी बालिकाश्रम रोडवर ओंकार भागा नगरे या युवकाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली होती. शेवगाव येथे चोराच्या हल्ल्यात व्यापारी आणि त्याच्या भावजयी ची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तसेच पाथर्डी येथे एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह विहिरीत आढळून आले होते. या घटना ताज्या असतानाच पारनेर तालुक्यातील गव्हाणवाडी येथे जुन्या भांडणाच्या कारणातून डोक्यात कुऱ्हाड घालून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.