Nitin Desai death case | नितीन देसाई मृत्यू प्रकरण, आज हायकोर्टात तातडीची सुनावणी?

Nitin Desai death case | नितीन देसाई यांच्यावर 252 कोटी रुपयांच कर्ज होते. 2016 आणि 2018 मध्ये त्यांनी एडलवाईज कंपनीकडून हे कर्ज घेतलं होतं.

Nitin Desai death case | नितीन देसाई मृत्यू प्रकरण, आज हायकोर्टात तातडीची सुनावणी?
Nitin Desai Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 8:17 AM

मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. हा गुन्हा रद्द व्हावा, या मागणीसाठी एडलवाईज कंपनीच्या दोन पदाधिकाऱ्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. राजकुमार बन्सल आणि रशेष शाह यांनी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. एडलवाईज कंपनीच्या वतीने या दोघांसाठी प्रसिद्ध वकिल अमित देसाई युक्तीवाद करणार आहेत.

दिलेलं कर्ज वसूल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेच पालन करणं यात काही गुन्हा नाहीय, असं याचिकाकर्त्यांच म्हणणं आहे.

एडलवाइजचे एमडी चौकशीसाठी आज हजर होणार का?

चेअरमन रशेष शाह आणि राजकुमार बन्सल यांच्या याचिकेवर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी एडलवाइज कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना सर्व कागदपत्र घेऊन रायगड पोलिसांनी चौकशीला बोलावलं आहे. नितीन देसाई यांनी मागच्या आठवड्यात बुधवारी आपलं जीवन संपवलं होतं.

ऑडिओ रेकॉर्डिंग्समध्ये सर्वकाही?

कर्जतच्या प्रसिद्ध एन.डी. स्टुडिओत नितीन देसाई यांनी अखेरचा श्वास घेतला होता. जीवन संपवण्याआधी त्यांनी काही ऑडिओ रेकॉर्डिंग्स केले होते. त्यात चार जणांची नाव आहेत. नितीन देसाई यांच्या या ऑडिओ क्लिपमधून त्यांनी टोकाच पाऊल का उचललं? ते समजू शकतं. महाराष्ट्र सरकारने देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय जाहीर केलाय. नितीन देसाई यांच्यावर किती कर्ज होतं?

नितीन देसाई यांच्यावर 252 कोटी रुपयांच कर्ज होते. 2016 आणि 2018 मध्ये त्यांनी एडलवाईज कंपनीकडून हे कर्ज घेतलं होतं. कोरोना काळानंतर कर्जाचे हप्ते फेडण्यात अडचणी येत होत्या. त्यात कर्जाचा बोजा वाढत चालला होता. एनडी स्टुडिओवर जप्तीची कारवाईची प्रक्रिया होऊ शकली असती. नितीन देसाई त्याच तणावाखाली होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.