व्हॅलेंटाईन वीकमध्येच प्रियकरानं संपवलं जीवन, प्रेयसीला बेड्या!

औरंगाबादेत मात्र प्रेमीयुगुलांसाठी एक धक्कादायक घटना घडली आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्येच एका प्रियकरानं गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.

व्हॅलेंटाईन वीकमध्येच प्रियकरानं संपवलं जीवन, प्रेयसीला बेड्या!
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 2:22 PM

औरंगाबाद : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. सर्वत्र प्रेमाचा बहर आलेला पाहायला मिळत आहे. पण औरंगाबादेत मात्र प्रेमीयुगुलांसाठी एक धक्कादायक घटना घडली आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्येच एका प्रियकरानं गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. महत्वाची बाब म्हणजे प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(Boyfriend commits suicide in Aurangabad, girlfriend arrested)

राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या

कृष्णा खुटेकर असं आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचं नाव आहे. त्याने आपल्या राहत्या घरी केबल वायरच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणात प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. संबंधित मुलगी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची सातत्यानं धमकी देत होती. त्याचबरोबर मानसिक त्रास देत आर्थिक लुबाडणूक करत असल्याचाही आरोप आरोपी तरुणीवर करण्यात आला आहे.

प्रियकराच्या खिशात चिठ्ठी आढळली

संबंधित मुलगी आपल्याला मानसिक त्रास देत होती. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची धमकी देत होती. त्याचबरोबर आर्थिक लुबाडणूक करत असल्याची चिठ्ठी लिहून कृष्णा खुटेकर याने आत्महत्या केली आहे. पोलिस तपासात मृतदेहाच्या खिशात ही चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत कृष्णा याने संबंधित मुलीचं नाव टाकून, “ती मला खूप त्रास देत आहे. मला काही काही धमक्या देत आहे. मी खून मानसिक तणावातून जात हे पाऊल उचलत आहे. तरी, माझी काही चूक नाही”, असं लिहिलं आहे.

या प्रकरणात मृत मुलाच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित मुलगी मुलाकडे नेहमी पैशांची मागणी करायची. तसंच खूप त्रास देत होती, अशी तक्रार मृत कृष्णा खुटेवारच्या आईने केली आहे.

संबंधित बातम्या :

प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न करुन स्वत:ला सुतळी बॉम्बने उडवून दिले; मुंबईतील धक्कादायक घटना, प्रियकर अटकेत

इशकजादे!! आधी दारु प्यायले, मग एकमेकांच्या डोक्यात गोळ्या घातल्या!

Boyfriend commits suicide in Aurangabad, girlfriend arrested

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.