मध्यरात्री प्रेयसीच्या घरात घुसला पोलीस कर्मचारी, मग जे घडले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल !

प्रेयसीसोबत काही तरी वाद झाला. मग प्रियकराने जे केले त्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. फेसबुक पोस्ट शेअर करत प्रियकराने भयंकर कृत्य केले.

मध्यरात्री प्रेयसीच्या घरात घुसला पोलीस कर्मचारी, मग जे घडले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल !
प्रियकराकडून प्रेयसीच्या कुटुंबावर गोळीबार
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 2:59 PM

शाजापूर : मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीने धोका दिल्याने पोलीस कर्मचारी असलेल्या प्रियकराने जे केले त्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून तिच्यासह तिच्या कुटुंबीयांवर गोळीबार केला. या गोळीबारात तरुणीच्या वडिलांचा मृत्यू झाला, तर तरुणी आणि तिचा भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांची प्रकृती गंभीर आहे. गोळीबार करण्यापूर्वी प्रियकराने फेसबुक पोस्ट टाकली होती. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यानंतर प्रियकराने आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय म्हटलंय फेसबुक पोस्टमध्ये?

पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या मैत्रिणीसोबतचे फोटो फेसबुकवर शेअर केले होते. यावेळी त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “प्यार में धोखा इसलिए ठोका, वो भी उसको नहीं…मैंने उसको ऐसा दर्द दिया है की, वह जिंदगी भर नहीं भूल पाएगी”. यानंतर तो प्रेयसीच्या घरी घुसला आणि गोळ्या झाडल्या. यानंतर त्याने स्वतःही जीवन संपवले. दोघांमधील मतभेदामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेत तरुणीचे वडील झाकीर शेख यांचा मृत्यू झाला. तर तरुणी आणि तिचा भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर इंदूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पोलीस कर्मचारी सुभाष खराडी हा देवास येथे तैनात होता. घटनास्थळाहून फोल्डिंग शिडी आणि स्कूटी पोलिसांनी जप्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.