AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियकरासाठी पतीला सोडले, 15 वर्षांचे प्रेमसंबंध, मग अचानक काय घडले की प्रियकराने…

दोघांचे प्रेमसंबंध होते. प्रियकरासाठी ती पतीला सोडून आली. गेल्या 15 वर्षापासून त्यांचे प्रेम होते. पण अचानक असे काय घडले की त्याला या प्रेमाचा विसर पडला.

प्रियकरासाठी पतीला सोडले, 15 वर्षांचे प्रेमसंबंध, मग अचानक काय घडले की प्रियकराने...
नागपुरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
| Updated on: May 25, 2023 | 8:42 AM
Share

हैदराबाद : प्रियकरासाठी ती पहिला पतीला सोडून आली होती. गेल्या 15 वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेमसंबंधाचा शेवट इतका धक्कादायक असेल हे तिलाही स्वप्नातसुद्धा वाटले नसेल. हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून प्रियकरानेच आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर शीर धडापासून वेगळे करत, एका पिशवीत गुंडाळून कचऱ्यात फेकले होते. तर मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. अनुराधा रेड्डी असे मयत महिलेचे नाव आहे. तर चंद्रमोहन असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिला ही चंद्रमोहनच्याच घरी भाड्याने राहत होती.

आरोपी आणि पीडितेचे 15 वर्षांपासून अनैतिक संबंध

हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराधाचे चंद्रमोहनसोबत सुमारे 15 वर्षांपासून अनैतिक संबंध होते. वर्षापूर्वी ती पतीपासून विभक्त झाली होती. आपले अनैतिक संबंध कायम ठेवून पदवीधर असलेल्या चंद्रमोहनने तिला स्वतःच्या घरात भाड्याने ठेवले होते. ही महिला 2018 पासून फायनान्समध्ये काम करत होती, गरजू लोकांना पैसे उधार देऊन मोठे व्याज आकारत होती. महिलेसोबतच्या अनैतिक संबंधाचा फायदा घेत चंद्रमोहनने सुमारे 7 लाख रुपयांचे कर्ज घेतले, परंतु ते परत करत नव्हता.

पैसे परत करण्यासाठी दबाव टाकत होती म्हणून हत्या

पैसे परत घेण्यासाठी अनुराधा चंद्रमोहनवर खूप दबाव आणला, तरीही तो पैसे परत करत नव्हता. याच कारणातून 12 मे रोजी दोघांमध्ये खूप वादावादी झाली, मग वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. त्यानंतर चंद्रमोहनने अनुराधाची हत्या केली. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दगड कापण्याचे यंत्र विकत घेतले. या यंत्राच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे केले.

काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत डोके भरून, रिक्षात नेले आणि कचराकुंडीत फेकले. उर्वरित मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सुटकेसमध्ये ठेवण्यात आला. मृतदेहाला दुर्गंधी येऊ नये म्हणून वेळोवेळी फिनाइल, डेटॉल, नॅप्थालीन, अत्तर शिंपडायचा. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना बिना धडाचे शीर सापडले आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी अखेर सीसीटीव्ही, विविध विभागांच्या मदतीने मारेकऱ्याची ओळख पटवली.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.