विवाहित प्रेयसीला भेटायला बोलावले, मग जे केले ते भयंकर !

कामाच्या ठिकाणी दोघांची ओळख झाली. मग दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. मात्र काही दिवसांनी प्रेयसीने दुरावा निर्माण केला. या कारणामुळे प्रियकर संतापला.

विवाहित प्रेयसीला भेटायला बोलावले, मग जे केले ते भयंकर !
चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 10:18 AM

गाझियाबाद : प्रेयसी आपल्याकडे यायला तयार नव्हती म्हणून प्रियकराने तिला भेटायला बोलावून तिच्या गोळी झाडल्याची धक्कदायक घटना गाझियबादमध्ये घडली आहे. पीडित प्रेयसी ही विवाहित आहे. तिचे आरोपीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. मात्र नंतर तिने प्रियकरासोबत दुरावा निर्माण केला. याच रागातून त्याने हे कृत्य केले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गोळीबारात महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेला उपचारासाठी एमएमजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्राथमिक उपचारानंतर तिला जीटीबी रुग्णालयात रेफर करण्यात आले. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कामाच्या ठिकाणी ओळख झाली, मग प्रेमसंबंध जुळले

गाझियाबादच्या विजयनगर पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. आरोपी आणि पीडिता दोघेही लग्नसमारंभात जेवण बनवण्याचे काम करायचे. तेथेच त्यांची ओळख झाली आणि दोघे प्रेमात पडले. मग दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. काही दिवसांनी अचानक प्रेयसीने भेटणे बंद केले. मात्र आरोपी सतत महिलेचा पाठलाग करायचा आणि तिला आपल्याकडे येण्यास सांगायचा.

प्रेयसीला भेटायला बोलावले मग गोळी झाडली

आरोपीने मंगळवारी प्रेयसीला भेटायला बोलावले. यानंतर तिच्यावर गोळी झाडली. यात महिला गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळली. गोळीबारानंतर आरोपी तेथून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महिलेची प्रकृती गंभीर आहे.

हे सुद्धा वाचा

सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले आहे. याप्रकरणी नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन पुढील कारवाई सुरु आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.