AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरीमुलीने वॉशरुममध्ये जाण्यासाठी नवऱ्या मुलाकडे 10 रुपये मागितले, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक

Bride Groom Shocking News : लग्न 10 फेब्रुवारीला झालं होतं. सासरकडची मंडळी दोन दिवसांपूर्वी 19 फेब्रुवारीला मां विध्यवासिनीच्या दर्शनासाठी गेले होते. नवरीच कृत्य पाहिल्यानंतर समाजात अशी पण माणसं असतात का? हा प्रश्न पडतो.

नवरीमुलीने वॉशरुममध्ये जाण्यासाठी नवऱ्या मुलाकडे 10 रुपये मागितले, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक
brideImage Credit source: cctv
| Updated on: Feb 21, 2023 | 9:50 AM
Share

Bride Groom Shocking News : उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये एक चक्रावून टाकणारी घटना समोर आलीय. लग्नानंतर एक जोडपं मां विंध्यवासिनीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलं होतं. त्यावेळी नवविवाहित वधू तिथून पळून गेली. सासरकडच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, नववधू वॉशरुममध्ये जातेय सांगून तिथून निसटली. नववधून वॉशरुममध्ये जातेय सांगून गेली. पण बराचवेळ ती आली नाही, तेव्हा शोध सुरु झाला. नववधू नवरदेव व त्याच्या कुटुंबियांना फसवून बॉयफ्रेंडसोबत तिथून पळून गेली. या प्रकरणात नवरदेवाने विंध्याचल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याने मदत मागितली आहे.

CCTV फुटेजमध्ये काय दिसलं?

नवरी मुलगी आधी रस्त्यावरुन चालत होती. थोड्यावेळाने एक लाल रंगाची बाईक आली. त्यावर बसून ती पसार झाली. पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेजमधून हे समोर आलय. नवरीमुलगी यूपीच्या आजमगढची रहिवाशी आहे. जौनपुरच्या मुलाबरोबर तिच लग्न झालं होतं. लग्न 10 फेब्रुवारीला झालं होतं. सासरकडची मंडळी दोन दिवसांपूर्वी 19 फेब्रुवारीला मां विध्यवासिनीच्या दर्शनासाठी गेले. तिथूनच नवरी मुलगी पसार झाली.

नेमकं काय घडलं?

मंदिरात दर्शन केल्यानंतर कुटुंबीय खाण्या-पिण्यामध्ये व्यस्त होते. त्याचवेळी नवरीने नवऱ्याकडे 10 रुपये मागितले. ती वॉशरुमच्या दिशेने गेली. त्यानंतर ती एकटीच मंदिर परिसराच्या बाहेर आली. बराचवेळ होऊन नवरी मुलगी कशी परतली नाही, म्हणून सासरकडच्या मंडळींनी तिचा शोध सुरु केला. त्यावेळी ती बेपत्त झाल्याच लक्षात आलं. नवरी सापडत नसल्याने सासरकडच्या मंडळींचा गोंधळ वाढला. सगळेच तिचा शोध घेऊ लागले. पोलीस तपासात, ती कुठल्यातरी मुलाबरोबर बाईकवर बसून फरार झाल्याच समजलं. पोलिसांना अजूनपर्यंत लिखित तक्रार मिळालेली नाही. तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई होईल.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.