बँड, बाजा, वरात, घोडा… सगळे तिच्यासाठी आले, पण तीच गायब झाली ? त्या वधूचं नक्की काय झालं ?

वरात येण्यापूर्वी वधू ब्युटी पार्लरमध्ये काकूसोबत गेली होती. पण थोड्या वेळाने तिची काकू एकटीच परत आल्याने लग्नघरात गोंधळ उडाला.

बँड, बाजा, वरात, घोडा... सगळे तिच्यासाठी आले, पण तीच गायब झाली ? त्या वधूचं नक्की काय झालं ?
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 6:08 PM

लखनऊ : लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. वधूकडे जाण्यासाठी बँड-बाजा, घोडा, वरात सगळे (marriage barat) तयार होते. वराकडील मंडळी निघणारच होती, तेवढ्यात एक अशी बातमी आली ज्याने सर्वांच्या पााखालची जमिनच सरकली. जिच्यासोबत भावी आयुष्य घालवायचं स्वप्न नवरदेवाने रंगवल होतं, ती वधूच (bride fled with lover) गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्नाच्या तयारीसाठी पार्लरमध्ये गेलेली वधू परत न आल्याने एकच गोंधळ उडाला.

लग्न लागण्याच्या अवघे काही तास आधी ब्युटी पार्लरमधून वधू फरार झाल्याचे हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हमीरपूरच्या कोतवाली भागातील आहे.  लग्नाची वरात येणार होती. एकीकडे लग्नाची वरात काढण्यासाठी वराच्या बाजूने पूर्ण तयारी झाली होती, तर दुसरीकडे वधू पक्षाने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती, वधूहू तयार होण्यासाठी ब्युटी पार्लरला रवाना झाली होती. तिची काकूही तिच्यासोबत ब्युटी पार्लरमध्ये गेली. पण थोड्या वेळाने ब्युटी पार्लरमधून काकू एकटीच घरी आल्यावर लग्नघरात गोंधळ माजला.

 वधू अखेर गेली कुठे ?

खरंतर, काकूने मुलीच्या वडिलांसह कुटुंबीयांना सांगितले की, वस्तीतील एक तरुण तिच्या मुलीला ब्युटी पार्लरमधून घेऊन गेला. वधूकडच्या लोकांनी या घटनेची माहिती लगेच वराच्या कुटुंबियांना बाजूने दिली. ही माहिती मिळाल्यापासून वराच्या घरातही डीजेचा दणदणाट बंद झाला असून निराशा पसरली आहे.

नवरदेव वरात घेऊन येणार होता

याप्रकरणी नवरा मुलगा मोहितने सांगितले की, त्याने छान तयारी करून, नवे कपडे घालून लग्नाची वरात काढण्याची तयारी केली होती. मात्र तेवढ्यात वधू ब्युटी पार्लरमधूनच तिच्या प्रियकरासह पळून गेल्याची माहिती मिळाली.

विधवा आईने कसेबसे जमवले होते पैसे

वधू पळून गेल्याची बातमी कळताच वराच्या आईलाही मोठा धक्का बसला. पती निधनानंतर त्या माऊलीने काबाडकष्ट करून मुलाला मोठं केलं. अतिशय मेहनतीने पै-पै वाचवून त्यांनी लग्नासाठी खरेदी, तयारी केली होती. त्यांच्या घआमाचा, मेहनतीचा पैसा आता वाया गेला आहे. तो त्यांना परत कोण देणार असा प्रश्न वराची आई विचारत आहे.

वरात निघण्यापूर्वी मिळाली बातमी

नवरा मुलगा मोहित याच्या आईने सांगितले की, लग्नाच्या मिरवणुकीसाठी घरातून निघताना ही माहिती मिळाली. ज्या मुलीला ती सून म्हणून घरी आणणार होती, ती आधीच ब्युटी पार्लरमधून पळून गेली होती. रात्रभर वधूचे कुटुंबीय व वराच्या बाजूचे लोक वधूचा शोध घेत राहिले, मात्र तिचा कोणताही पत्ता लागला नाही.

हमीरपूर पोलिस स्टेशन कोतवालीचे प्रभारी निरीक्षक दुर्ग विजय सिंह यांनी सांगितले की, दोन्ही पक्ष पोलिस ठाण्यात आले होते. रात्रभर पोलिसांनी वधूचा शोध घेतला. मात्र, अद्याप याप्रकरणी कोणतीही तक्रार आलेली नाही. तहरीर प्राप्त होताच एफआयआर नोंदवून पुढील कारवाई केली जाईल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.