भावोजी बहिणीला नेहमी त्रास द्यायचा, भावाला बहिणीचे दुःख पहावले नाही, मग त्याने जे केले त्याने सर्वच हैराण झाले !

बहिणीचा पती तिला दररोज त्रा, द्यायचा. भावाला बहिणीचा त्रास पाहवत नव्हता. अखेर एक दिवस सहनशक्तीचा अंत झाला. मग जे घडलं त्याने गावात खळबळ उडाली.

भावोजी बहिणीला नेहमी त्रास द्यायचा, भावाला बहिणीचे दुःख पहावले नाही, मग त्याने जे केले त्याने सर्वच हैराण झाले !
कौटुंबिक वादातून भावाने भावाला संपवले
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 1:16 PM

बैतूल : बहिणीला पती खूप त्रास द्यायचा. दररोज मारहाण करायचा. बहिणीचा त्रास पाहवत नसल्याने संतापलेल्या भावाने भावोजीचा काटा काढल्याची घटना मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये घडली. काका, चुलत भाऊ आणि दोन मित्रांच्या मदतीने भावाने काठीने मारहाण करत भावोजीला संपवले. हत्येनंतर मृतदेह शेतात टाकून आरोपी पळाले. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अन्य दोन आरोपी फरार आहेत. अरविंद डिगरसे असे मयताचे नाव आहे. युवराज कोडले असे मुख्य आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

बहिणीचा दररोज छळ करायचा भावोजी

युवराजची बहिण इंद्राचा अरविंदसोबत दुसरा विवाह झाला होता. अरविंद विवाहानंतर इंद्राचा खूप छळ करायचा. तिला दररोज मारहाण करायचा. अरविंद 6 जुलै रोजी आपल्या सासरवाडीत आला होता. तेथे भांडण करु लागला. यानंतर तो शेताकडे गेला. यावेळी युवराज, त्याचा काका शिवचरण, भाऊ राहुलही त्याच्या पाठोपाठ लाठ्या-काठ्या घेऊन पळाले. तेथे त्याची लाठ्या-काठ्यांनी मारहाण करुन हत्या केली. यानंतर युवराजचे मित्र भोजू कोडले आणि निक्की कोडले यांच्या मदतीने मृतदेह सुभाष कोडलेच्या शेतात टाकला.

घरासमोर गाडी पाहून पोलिसांना संशय आला

पोलिसांना सुभाष कोडलेच्या शेतात मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मग अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. यादरम्यान अरविंदची गाडी सासरवाडीतील घरासमोर दिसली. घरी कुणीही नव्हते. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी युवराज आणि शिवचरण यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.