आजारी बापाचा मृत्यू झाला, मुलाला वेगळाच संशय आला, अन् वहिनीसोबत नको ते करुन बसला !

आजारी सासऱ्याचे निधन झाले म्हणून सून मयताला आली. दिराच्या मनात काहीतरी भलतंच आलं अन् एकावर नाही दोघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.

आजारी बापाचा मृत्यू झाला, मुलाला वेगळाच संशय आला, अन् वहिनीसोबत नको ते करुन बसला !
जादूटोणा केल्याच्या संशयातून दिराने वहिनीला संपवलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 12:33 PM

साहिबगंज : ग्रामीण भागात अंधश्रद्धेचा पगडा कमी होताना दिसत नाही. जादूटोणा, काळी जादू यासारख्या प्रकारातून गुन्हेगारी वाढली आहे. विशेषतः महिला या अघोरी प्रकारामुळे बळी पडत आहेत. जादूटोणाच्या संशयातून माणूस माणसाचा शत्रू बनला आहे. अशीच एक झारखंडमध्ये घडली आहे. जादूटोणा केल्याच्या संशयातून दिराने वहिनीची हत्या केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील मिर्झाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरवा पंचायतीच्या डुंगरी टोला येथे ही घटना घडली आहे. मरंग कुडी तुडू असे मयत महिलेचे नाव आहे, तर देतबाबू हंसदा असे आरोपी दिराचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस चौकशीत आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे.

वहिनीने जादूटोणा केल्याच्या संशयातून हत्या

देतबाबू हंसदा याचे वडील मरंग हंसदा यांचे शनिवारी निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. ते आधीपासूनच आजारी होते. सासऱ्याच्या निधनानंतर सून मरंग कुडी तुडू आपल्या पतीसह तेथे आली. सून मरंग सासऱ्याच्या मृतदेहाजवळ बसून रडत होती. दरम्यान, वहिनीने जादूटोणा केल्यामुळे आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा देतबाबू हंसदा याचा समज झाला. यातून त्याने हातात कुऱ्हाडी घेऊन तिचा पाठलाग सुरू केला. महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र देतबाबू हंसदा याने तिच्यावर हल्ला केला, यात तिचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांकडून आरोपीला अटक

गावकऱ्यांनी मिर्झाचौकी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच मिर्झाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी देतबाबू हंसदा याला अटक केली. मयत महिलेला तीन मुले आणि दोन मुली अशी पाच मुले आहेत. पीडित जोडपे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.