AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Crime: पश्चिम बंगालमध्ये तस्करांच्या मनसुब्यावर पाणी, 40 सोन्याची बिस्कीटं जप्त

बीएसएफच्या जवानांनी सोने तस्करांचे (Gold Smuggling) मनसुबे उधळून लावले आहेत. दक्षिण बंगाल फ्रंटियर, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी इछामती नदीच्या काठावरुन 40 सोन्याची बिस्किटे जप्त केली.

West Bengal Crime: पश्चिम बंगालमध्ये तस्करांच्या मनसुब्यावर पाणी, 40 सोन्याची बिस्कीटं जप्त
सोन्याच्या तस्करीचा डाव उधळलाImage Credit source: ANI
| Updated on: Mar 17, 2022 | 6:52 PM
Share

पश्चिम बंगालमधील (West bengal crime) उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील भारत-बांगलादेश सीमेवर (India-Bangladesh Border) लष्करांने मोठी कारवाई केली आहे. बीएसएफच्या जवानांनी सोने तस्करांचे (Gold Smuggling) मनसुबे उधळून लावले आहेत. दक्षिण बंगाल फ्रंटियर, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी इछामती नदीच्या काठावरुन 40 सोन्याची बिस्किटे जप्त केली. मात्र यात कोणत्याही तस्कराला अटक करण्यात यश आलेले नाही. एएनआयच्या वृत्तानुसार सीमा सुरक्षा दलाच्या दक्षिण बंगाल फ्रंटियरने ही माहिती दिली आहे. बीएसएफच्या जवानांनी आज सोन्याच्या तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला असल्याचे उघडकीस आले आहे. बीएसएफने बांगलादेशच्या सीमेवर पाहरा वाढवली आहे आणि घुसखोर आणि तस्करांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. बुधवारी रात्रीच माथाभंगा परिसरात बीएसएफच्या जवानांनी एका तस्कराचा खात्मा केला होता. त्यानंतर आज ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

एनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

मोठ्या तस्करीचा डाव उधळला

भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या विशेष दक्षतेमुले हे यश प्राप्त झाले आहे. तस्करीतच्या प्लॅनमध्ये असलेल्या अनेक टोळ्या सीमाभागात सैनिकांची नजर चुकवण्यासाठी वेगवेगळे डावपेच अवलंबत असतात, मात्र सैन्यदल त्यांचे मनसुबे हाणून पाडत असल्याचे दिसून येत आहे. दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या बीएसएफ जवानांनी उत्तर 24 परगणा सीमेवर तस्करांच्या अशा छुप्या मार्गाचा पर्दाफाश केला आहे. जप्त करण्यात आलेली सोन्याची बिस्किटे संबंधित कस्टमच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीएसएफ इंटेलिजन्सकडून सोन्याची तस्करी करण्याची डाव असल्याची माहिती मिळाली होती.

सुरक्षा दलाचा तस्करांना इशारा

बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, भारत-बांगलादेश सीमेवर तस्करी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दल कठोर पावले उचलत आहे, त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.तसेच तस्करांना सोडले जाणार नाही, असेही त्यांनी कडक शब्दात बजावले आहे. सैनिकांच्या नजरेतून काहीही लपून राहू शकत नाही.बीएसएफच्या जवानांना तस्करांच्या प्रत्येक मोडस ऑपरेंडीचे योग्य प्रशिक्षणही दिले जात आहे, जेणेकरून तस्करांचा सापळा मोडता येईल, असेही ते म्हणाले.

Yeola | पैठणीच्या माहेरघरात 3 महाराणी पैठणींची चोरी! महिला चोर CCTV कॅमेऱ्यात कैद

Nagpur | अर्धवट जळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं! आत्महत्या केल्याचं उघड, का दिला जीव?

पालिकेच्या भवनातच सफाई कर्मचारी म्हणतात या बसुया, पुन्हा एक दारू पार्टी

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.