घरगुती कारणावरुन मायलेकांनी घेतलं उंदीर मारण्याचं औषध! मुलाचा मृत्यू, मायलेकीची मृत्यूशी झुंज सुरु

उपचारादरम्यान 14 वर्षाच्या धनंजय तावडेचा मृत्यू झाला. त्याची आई आणि बहिणीवर सध्या औरंगाबादेतील रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. धनंजय तायडेच्या मृत्यू प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घरगुती कारणावरुन मायलेकांनी घेतलं उंदीर मारण्याचं औषध! मुलाचा मृत्यू, मायलेकीची मृत्यूशी झुंज सुरु
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 9:18 PM

बुलडाणा : घरगुती कारणावरुन मायलेकांनी विषारी औषध घेतल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यातील (Buldhana) चिखलीमध्ये घडलाय. चिखलीच्या परिसरातील या घटनेत 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. तर आई आणि मुलीची मृत्यूशी झुंज सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार चिखलीतील चिंच परिसरात राहणाऱ्या विष्णू तायडे यांची पत्नी, मुलगी आणि मुलाने घरगुती कारणावरुन उंदीर मारण्याचं औषध (Rat poison) घेतलं. हा प्रकार समोर आल्यानंतर तिघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान 14 वर्षाच्या धनंजय तावडेचा मृत्यू झाला. त्याची आई आणि बहिणीवर सध्या औरंगाबादेतील रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. धनंजय तायडेच्या मृत्यू प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

बुलडाणा शहरातील दुसऱ्या एका घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. घरासमोरील अंगणात खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडून शिवाजी बोर्डे यांचा दीड वर्षाच्या मुलगा वेदांतचा मृत्यू झालाय. वेदांत घरामध्ये खेळत होता. मात्र काही वेळाने तो दिसला नाही. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी म्हणून घरातील सदस्य त्याला पाहण्यासाठी बाहेर आले. तेव्हा तो पाण्याच्या टाकीत पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाण्याच्या टाकीत पाण्याचा साठा करुन ठेवला होता. वेदांत त्यात पडल्यानंतर नाका तोंडात पाणी गेल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले.

परिसरात हळहळ

वेदांत पाण्यात पडल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वेदांतचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.वेदांत लहान असल्याने परिसरात तो अनेकांचा लाडका होता. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरातील अनेकांना धक्का बसला आहे.

हे सुद्धा वाचा

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.