शिक्षकाकडून दहावीच्या दोन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, शिक्षक फरार झाला असून…
धर्मेंद्र उत्तम हिवाळे असं शिक्षकाचं नाव असून राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये विज्ञान शिकवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दहावीच्या मुलांवरती अत्याचार झाल्यानंतर त्यांनी बुलढाणा शहर पोलीस त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) तालुक्यातील कोलवड (kolvad) शिवारात असलेल्या राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये विज्ञान विषय शिकवणाऱ्या धर्मेंद्र उत्तम हिवाळे या शिक्षकाने दहावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे, यावरून पीडित विद्यार्थ्यांनी बुलढाणा शहर पोलीस (buldhana police) ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सदर शिक्षकावर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी धर्मेंद्र हिवाळे हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. यापूर्वी देखील या शिक्षकाने असा प्रकार केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे इतर विद्यार्थी तक्रार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा सगळा प्रकार उजेडात आला
ही घटना उघडकीस आल्यापासून संपूर्ण भागात या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. शिक्षकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्यावेळी आतापर्यंत किती मुलांच्यावरती अत्याचार केले आहेत हे सु्द्धा उघडकीस येण्याची शक्यता आहे. दोन विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा सगळा प्रकार उजेडात आला आहे.
बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
धर्मेंद्र उत्तम हिवाळे असं शिक्षकाचं नाव असून राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये विज्ञान शिकवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दहावीच्या मुलांवरती अत्याचार झाल्यानंतर त्यांनी बुलढाणा शहर पोलीस त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली
तक्रार दाखल झाल्याची माहिती शिक्षकाला मिळाल्यानंतर शिक्षक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस त्या शिक्षकाचा विविध पद्धतीने शोध घेत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत शिक्षकाने अनेक विद्यार्थ्यांसोबत असा प्रकार केल्याची सुध्दा चर्चा आहे. त्यामुळे शिक्षकाला ताब्यात घेतल्यानंतर अनेक प्रकरणं उजेडात येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.