Buldhana : हात पाय बांधून शौचालयात कोंडलं, बंदुकीचा धाक दाखवून 20 लाखांचा ऐवज पळविला
महाराष्ट्रात आत्तापर्यंत अनेकदा अशा घडना अनेकदा घडल्या आहेत. तसेच पोलिसांनी अनेकदा आरोपीने काही तासांच्या आत ताब्यात देखील घेतले आहे. त्यामुळे काल झालेल्या बुलढाण्यातील प्रकरणात पोलिस अधिक सज्ज झाले आहेत.
बुलढाणा – बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या सिंदखेड राजा (Sindkhed Raja) तालुक्यातील दरेगाव येथे दरोडेखोरांचा थरार पाहायला मिळाला आहे. गजानन बंगाळे (Gajanan Bangale) यांच्या घरातील सोने आणि चांदी असे मिळून जवळपास 20 लाखांपेक्षा जास्त किमतीचे दागिने बंदुकीचा धाक दाखवून लुटले आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत घरातील एकजण जखमी झाला झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे बुंदुकीचा धाक दाखवून वीस लाखांचा ऐवज लंपास केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सदर घटनेची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली असून पोलिस त्यांचा कसून चौकशी करीत आहेत.
एकाला बेदम मारहाण केली
दरेगाव येथील गजानन बंगाळे यांचे कुटुंब काल रात्री आपल्या घरात झोपले होते. त्यावेळी रात्री दहाच्या सुमारास काही अज्ञातांनी त्यांना दरवाजा ठोकून जागे केले. तसेच त्यांना दरवाजा उघडायला भाग पाडले. घरात प्रवेश केल्यानंतर दरोडेखोरांनी एकाला जबर मारहाण केली. त्यामुळे घरचे एकदम भयभीत झाले होते. त्यावेळी त्यांनी कुटुंबातील सगळ्या सदस्यांना बंदुकीचा धाक दाखवला. घरातील नेकलेस, मंगळसूत्र, एकदानी, पाटल्या, मोबाईल सह रोख पन्नास हजार रुपये असे एकूण 20 लाख पेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला. त्यापुर्वी दरोडेखोरांनी सुरेश बंगाळे यांना हात पाय बांधून शौचालयात कोंडून ठेवले होते. घरच्या इतर लोकांनी ही माहिती तात्काळ पोलिसांना कळवळी. परंतु पोलिस येण्यापुर्वी शोध जलद गतीने घ्यावा अशी नागरिकांची मागणी आहे.
तिथले नागरिक अत्यंत भयभीत झाले आहेत
महाराष्ट्रात आत्तापर्यंत अनेकदा अशा घडना अनेकदा घडल्या आहेत. तसेच पोलिसांनी अनेकदा आरोपीने काही तासांच्या आत ताब्यात देखील घेतले आहे. त्यामुळे काल झालेल्या बुलढाण्यातील प्रकरणात पोलिस अधिक सज्ज झाले आहेत. तसेच वेगवेगळ्या पद्धतीने चोरांची चौकशी केली जात आहे. तसेच घटनास्थळी पोलिस अजून शोध घेत आहेत. तिथून त्यांच्या हाती काहीतरी लागेल अशी शक्यता आहे. ज्या गावात ही घटना घडली आहे. तिथले नागरिक अत्यंत भयभीत झाले आहेत. .