Buldhana : गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या, दहा महिन्यांच्या चिमुकलीला विष पाजल्याची शंका; मलकापूर पांग्रा येथील घटना

मुलगी गौरीला अत्यावस्थ स्थितीत मेहकर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र दिपालीने आत्महत्या का केली?

Buldhana : गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या, दहा महिन्यांच्या चिमुकलीला विष पाजल्याची शंका; मलकापूर पांग्रा येथील घटना
गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या, दहा महिन्यांच्या चिमुकलीला विष पाजल्याची शंका; मलकापूर पांग्रा येथील घटना Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 10:20 AM

बुलढाणा – आधी मैत्री झाली त्याचं रुपांतर प्रेमात झालं, सात जन्मसोबत राहण्याच्या नव्हे, तर सोबत जीवन मरणाच्या आनाभाका घेत जातीय व्यवस्थेला तिलांजली देत दोघांनी त्या लग्न ही केलं आहे. काही वर्षे सुखी संसाराची फळे चाखणाऱ्या या दाम्पत्यांनी (Couple) एका मुलीला जन्म देखील दिला आहे. 31 जुलै रोजी विवाहितेने गळफास घेत जगाचां निरोप घेतल्याची धक्कादायक घटना मलकापूर पांग्रा (Malkapur Pangra) येथे घडली आहे. स्वतःच्या 10 वर्षीय मुलीला ही विषारी औषध पाजल्याची शंका आहे. या तान्हुलीवर मेहकर येथील रुग्णालयात (Mehkar Hospital) उपचार सुरु असुन प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे.

10 महिन्यांच्या गौरीला विषारी औषध पाजल्याची शंका,

बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील निलेश वरकड हा युवक सुरत येथे कामाला होता. दरम्यान, त्याची तेथील दिपाली नामक तरुणीसोबत ओळख झाली. ओळखीने मैत्री आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालेय. मुलीच्या घरच्या लोकांचा विरोध असतानाही दोन वर्षांपूर्वी दोघांनीही आंतरजातीय प्रेम विवाह केलाय. त्यानंतर दोघेही मलकापूर पांग्रा येथे राहण्यास आले होते. सुखी संसाराची फळे चाखत असताना निलेश आणि दिपालीला मुलगी झाली. सध्या निलेश आणि दिपाली शेतातील घरात वास्तव्यास होते. दरम्यान, काल 31 जुलै रोजी दुपारी दिपालीने आपल्या 10 महिन्यांच्या गौरीला विषारी औषध पाजले असल्याची शंका असून त्यानंतर स्वतः गळफास घेत आपली जिवनयात्रा संपविली.

हे सुद्धा वाचा

मुलीची प्रकृती स्थिर, उपचार सुरु

मुलगी गौरीला अत्यावस्थ स्थितीत मेहकर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र दिपालीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.