Buldhana Crime : कामाच्या बहाण्याने पत्नीला मंदिराजवळ घेऊन गेला, पण … तो पत्नीच्या जीवावर का उठला ?

संशयाचा किडा डोक्यात शिरला की त्यामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अशाच संशयातून शहरात एक भयानक घटना घडली. मात्र...

Buldhana Crime : कामाच्या बहाण्याने पत्नीला मंदिराजवळ घेऊन गेला, पण ... तो पत्नीच्या जीवावर का उठला ?
Follow us
| Updated on: Oct 25, 2023 | 10:07 AM

गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा | 25 ऑक्टोबर 2023 : संशयाचा किडा (doubt) डोक्यात शिरला की त्यामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. एखाद्याविषयी मनात संशय आला की ती व्यक्ती मनातून उतरते आणि सगळ्याच गोष्टी खटकू लागतात. नवरा-बायकोच्या नात्यातही संशय आला की ते संपून जाण्याची शक्यता असते. मात्र याच संशयामुळे अशी एखादी नको ती कृती केली जाऊ शकते किंवा नको ते पाऊल उचलण्यात येत ज्यामुळे अख्खं आयुष्यच पणाला लागतं.

संशयामुळे संसाराची राखरांगोळी होऊ शकते. अशाच संशयामुळे एका इसमाने (doubt on wife) त्याच्या पत्नीचा काटा काढण्याचा निर्णय घेत भयानक पाऊल उचलले, मात्र सुदैवाने तिचं दैव बलवत्तर होतं. अकोल्यावरून बुलढाण्यात आणून राजूरच्या घाटात आपल्या पत्नीला जीवे मारण्याचा पतीचा कट फसल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. पत्नीच्या आरड्याओरड्यामुळे सतर्क होऊन इतरांनी मदतीसाठी धाव घेतली आणि तिचा जीव वाचला.

त्याने असं का केलं ?

शेख इब्राहिम शेख चांद असे या आरोपीचे नाव असून तो त्याच्या पत्नीच्या जीवावरच उठला होता. अकोल्यावरून बुलढाण्यात आणून राजूरच्या घाटात त्याने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. राजूरच्या घाटातील देवीच्या मंदिराजवळ शेख हा पत्नीला मारत असताना तिने आरडाओरडा केला. तो आवाज ऐकून लीस चौकीवर उपस्थित असलेल्या दोन होमगार्ड आणि त्या भागात व्यायाम करणाऱ्या दोन युवतींच्या सतर्कतेमुळे त्या महिलेचे प्राण वाचले.

आरोपी शेख इब्राहिम शेख चांद याला त्याच्या पत्नीवर संशय होता. त्याच कारणाने त्याने पत्नीस फारकत देण्याचे ठरवले होते. तिला मार्गातून काढण्यासाठी त्याने एक भयानक कट रचला. आणि कागडपत्र आणण्याच्या बहाण्याने तो पत्नीला घेऊन बुलढाण्याच्या राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ आला. मात्र तिथे आल्यावर त्याचा खरा चेहरा उघड झाला. आरोपीन एका ओढणीने पत्नीचा गळा आवळून तिला संपवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र जीव वाचवण्यासाठी त्याच्या पत्नीने जोरजोरात आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्याच परिसरात असलेल्या पोलीस चौकीतील दोघांनी तिचा आवाज ऐकला आणि मदतीसाठी धाव घेतली. तसेच मंदिराजवळ व्यायामासाठी आलेल्या दोन तरूणीदेखील महिलेच्या आवाजाच्या दिशेने गेल्या, मात्र समोरचे दृश्य पाहून त्या स्तिमित झाल्या. आरोपी इसम महिलेचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होता.

अखेर प्रसंगावधान राखत दोन्ही होमगार्ड आणि युवतींनी आरोपीला रोखले आणि त्या महिलेचे प्राण वाचवले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्याविरोधात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.