तो गाडी चालवायचा, ती मागे बसायची; बंटी-बबलीचा कारनामा सीसीटीव्हीत कैद

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना टार्गेट करत बंटी बबलीने परिसरात धुमाकूळ घातला होता. मात्र ही दुकली सीसीटीव्हीत कैद झाली अन् पोलिसांच्या तावडीत सापडली.

तो गाडी चालवायचा, ती मागे बसायची; बंटी-बबलीचा कारनामा सीसीटीव्हीत कैद
नागपूरमध्ये महिलांना लुटणाऱ्या बंटी-बबलीला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 7:54 PM

नागपूर : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना टार्गेट करुन चैन स्नॅचिंग करणाऱ्या बंटी बबलीला नागपूर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अल्पवयीन आरोपी गाडी चालवायचा आणि युवती मागे बसून चालत्या महिलांचे दागिने हिसकवायची. दोघेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी आतापर्यंत चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत आहेत. आरोपींनी आणखी किती गुन्हे केलेत याचा पोलीस तपास करत आहेत.

बंटी-बबलीने परिसरात घातला होता धुमाकूळ

आपल्या अल्पवयीन मित्रासोबत मिळून एक तरुणी नागपूरच्या तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचिंग करत होती. या बंटी-बबलीच्या जोडीने परिसरात धुमाकूळ घातला होता. ही बंटी बबलीची जोडी मॉर्निंग वॉकला निघणाऱ्या महिलांना टार्गेट करायचे. रस्त्यात एकटी महिला दिसली की, तिच्या जवळून गाडी घेऊन जायचे. अल्पवयीन मुलगा गाडी चालवायचा आणि ऋतुजा नावाची तरुणी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी घेऊन सुसाट वेगाने पळायचे.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी अटक

या बंटी बबलीच्या जोडीने गणेशपेठ आणि तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रकारच्या चार घटना केल्याचं उघड झालं. मात्र तहसील पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेची सोनसाखळी चोरताना हे बंटी बबली सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. मग पोलिसांनी यांचा शोध घेत या दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून चोरलेल्या सगळ्या वस्तू हस्तगत केल्या आहेत. अल्पवयीन मुलाचा फायदा घेत ही युती अशा प्रकारे मॉर्निंग वॉकच्या वेळेचा फायदा घेत चोऱ्या करायची.

हे सुद्धा वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.