Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : सहलीच्या गाडीचे ब्रेक फेल, चालकाचा चलाखपणा कामी आला, नागरिकांसह पोलिसांनी केलं कौतुक

शर्मा टूर्स अँड ट्रॅव्हलची बस होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने गाडी बाजूला करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. मागच्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सतत अपघात होत आहेत.

Nashik : सहलीच्या गाडीचे ब्रेक फेल, चालकाचा चलाखपणा कामी आला, नागरिकांसह पोलिसांनी केलं कौतुक
nashik school bus accidentImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 9:04 AM

शैलेश पुरोहित, नाशिक :  इगतपुरी (Nashik Igatpuri) तालुक्यात असलेल्या पूर्व भागातील नाशिक नगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा म्हैसवळण घाटात (maisvalan ghat) शाळेतील सहलीच्या बसचा अपघात झाला. हा अपघात ब्रेक फेल झाल्यामुळे झाला असल्याचे सांगितले जात आहे. चालकाने दाखवलेल्या चलाखपणामुळे विद्यार्थी (Student) थोडक्यात बचावले असल्याची संपुर्ण नाशिकमध्ये चर्चा आहे. बसमध्ये 40 विद्यार्थी होते. त्यापैकी चार विद्यार्थी गंभीर आहेत, आणि दहा विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात झाल्याची माहिती समजल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर एसएमबीटी रुग्णालयातील रुग्णवाहिका बोलावून विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं

इस्कॉन मंदिर संस्थेकडून चाळीस विद्यार्थी टाकेद तीर्थावर सहलीसाठी आले होते. त्यानंतर त्यांनी विश्रामगड (पट्टाकिल्ला) परिसराला भेट दिली. परतीच्या प्रवासात नाशिक नगर जिल्हा सरहद्दीवर वाघोबा जवळ गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी चालकाने चलाखपणा दाखवला आणि बस डोंगराच्या एका बाजूला घुसवली. त्यामुळे कसल्याची प्रकारची जीवितहानी झाली नाही. गाडी पलटी झाली, त्यामध्ये चार विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. तर दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

शर्मा टूर्स अँड ट्रॅव्हलची बस होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने गाडी बाजूला करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. मागच्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सतत अपघात होत आहेत. चालकाचे नागरिकांनी, पालकांनी आणि पोलिसांनी सुध्दा कौतुक केलं आहे. या सगळ्या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.