कोरोना काळात मुंबईत तब्बल 418 कोटीचा घोटाळा, व्यापारी बापलेकावर गुन्हा दाखल

मुंबईच्या घाटकोपरमध्ये पेशानं व्यापारी असलेल्या पिता-पुत्राने पार्टनरचा विश्वासघात करनं कंपनीत सावळागोंधळ केल्याचं पाहायला मिळतयं.

कोरोना काळात मुंबईत तब्बल 418 कोटीचा घोटाळा, व्यापारी बापलेकावर गुन्हा दाखल
Mumbai Crime FIR
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 10:28 PM

मुंबई : राज्यात कोरोनाच्या संकटात अनेक उद्योग, व्यापार ठप्प झालेत. अशावेळी मुंबईत तब्बल 418 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आलाय. मुंबईच्या घाटकोपरमध्ये पेशानं व्यापारी असलेल्या पिता-पुत्राने पार्टनरचा विश्वासघात करुन कंपनीत सावळागोंधळ केल्याचं पाहायला मिळतयं. कंपनी सदस्यांच्या संमतीशिवाय पार्टनरला वगळून तब्बल 418 कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी पंतनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Businessman Father and son accused of embezzling Rs 418 crore)

आरोपी फरार, घोटाळा नेमका कसा झाला?

या घोटाळ्याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी किरकोळ व्यापारी आणि त्याच्या मुलाच्या विरोधात केला गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहेत. दरम्यान हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलंय. दरम्यान हा घोटाळा नेमका कसा झाला याची माहिती घेतल्यास, 63 वर्षीय फिर्यादी मुकेश मेहता आणि आरोपी कमलेश शहा हे दोघेही एका कंपनीत पार्टनर होते. पण 2013 साली आरोपी कमलेश शाह यांनी फिर्यादी मुकेश मेहता यांच्याशी फारकत घेतली. कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता, परवानगीशिवाय कंपनीचं कार्यालयही इतरत्र हलवलं.

त्यानंतर आरोपी कमलेश शहा याने मग स्वतंत्र कंपनी स्थापन केली. साल 2018 मध्ये तक्रारदार मेहतांनी जेव्हा एका वेबसाईटवर कंपनीबाबत माहीती घेतली तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. फिर्यादी मेहता हे सुद्धा या कंपनीत भागीदार होते. त्यांनी अधिक माहिती घेतल्यानंतर कमलेश आणि राज दोघे मेहता भागीदार असलेल्या कंपनीच्या नावे व्यापार करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं. त्यातच हे ही लक्षात आले की, आरोपी कमलेश याने फिर्यादी मुकेश मेहता यांच्या मुलीची बनावट सही करून तब्बल 418 कोटी 50 लाखाचं कर्ज घेतलं. यापैकी 140 कोटींचं कर्ज आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड यांच्याकडून घेतल्याचा आरोप मुकेश मेहता यांनी केलाय.

‘आरोपींकडून जीवे मारण्याची धमकी’

कमलेश आणि राज यांनी हवालामार्फतही 200 कोटीचं कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. बुकी आणि ज्वेलर्स यांच्याकडूनही पैसा उकळण्यात आले आहेत. त्यांनी केलेल्या फसवणुकीच्या शेअर सर्टिफिकेट, ऑथॉरिटी लेटर आणि भागीदार असलेल्या कंपनीची भागीदारीतील 300 कोटीची मालमत्ताही संगनमत करून विकल्याचा आरोप करण्यात आलाय. कमलेश आणि राज यांच्या संपर्क असलेल्या बँक, संस्था आणि मित्र परिवार यांचे लागेबांधे वरिष्ठ पातळीवर, तसेच मोठ्या लोकांशी असल्याचंही बोललं जात आहे. या घोटाळ्याबाबत पीडित कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं फिर्यादी मुकेश मेहता यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

जैन साधूची मुंबईतील मंदिरात आत्महत्या, धर्मगुरुंनी स्वप्नात येऊन परत बोलावल्याची सुसाईड नोट

पवार आणि ठाकरे पितापुत्रांचे फेसबुकवर मॉर्फ फोटो, बारामतीत दोघांवर गुन्हा

Businessman Father and son accused of embezzling Rs 418 crore

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.