अकोल्यात व्यापाऱ्याच्या हत्येनं खळबळ, थेड दगडाने… खुनाचं कारण अचंबित करणारं!
अकोल्यात धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यापाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.

akola murder
- अकोला जिल्हातल्या अकोट तालुक्यातील अकोट-पोपटखेड रस्त्यावर हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
- व्यवसायातील मतभेद आणि आर्थिक वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल आहे. रमन चांडक असं हत्या झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे.
- अकोट पोपटखेड रस्त्यावरील पोपटखेड शेतशिवारात बंद पडलेल्या बोन कारखाना इमारतमध्ये हे हत्याकांड घडलं असून पैशांच्या आर्थिक व्यवहारातून रमन चांडक यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना ठार करण्यात आलंय.
- या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकारात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चांडक यांच्या हत्या प्रकरणात गजानन नामक ऐका व्यक्तीला अकोट ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
- चांडक हे अकोट तालुक्यातील पणज गावचे असून ते मागील काही 15 वर्षापासून अकोल्यात राहत होते.
- पैशांच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून हत्या झाल्याचं बोललं जात असून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.