जीवन विमा पॉलिसी काढली, मात्र लाभ कुणी दुसराच घेऊन गेला…

उल्हासनगर शाखेमध्ये वर्षाला प्रत्येकी एक लाखांचा हप्ता असलेला जीवन विमा 2010 मध्ये काढला होता. 2030 मध्ये या जीवन विम्याचे हप्ते पूर्ण होऊन त्याद्वारे बालानी यांना प्रत्येकी 46 लाख 61 हजार रुपये मिळणार होते.

जीवन विमा पॉलिसी काढली, मात्र लाभ कुणी दुसराच घेऊन गेला...
जीवन विमा पॉलिसीमध्ये फसवणूक
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 9:50 PM

निनाद करमरकर, TV9 मराठी, उल्हासनगर : उल्हासनगरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्याची पत्नीच्या नावावर काढलेल्या एका खाजगी जीवन विमा पॉलिसीमध्ये (Jeevan Vima Policy) कंपनीच्या रिलेशनशिप मॅनेजर, ब्रँच मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी बनावट सह्या करून फसवणूक (Fraud by Fake Signature) केली आहे. या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एका महिलेसह दोन जणांना अटक (Three Accused Arrested) केली आहे.

काय आहे प्रकरण ?

आसन बालानी आणि पत्नी पूजा बालानी या जोडप्याने एका खाजगी जीवन विमा कंपनीची पॉलिसी घेतली होती. उल्हासनगर शाखेमध्ये वर्षाला प्रत्येकी एक लाखांचा हप्ता असलेला जीवन विमा 2010 मध्ये काढला होता.

2030 मध्ये या जीवन विम्याचे हप्ते पूर्ण होऊन त्याद्वारे बालानी यांना प्रत्येकी 46 लाख 61 हजार रुपये मिळणार होते. मार्च महिन्यात कंपनीची एक कर्मचारी आसन बालानी यांच्या घरी आली. त्यांनी पूजा बालानी यांचा एक फोटो मोबाईलमध्ये काढला.

हे सुद्धा वाचा

तसेच केवायसी अपडेट करीत असल्याचे सांगत ओटीपी घेतला. त्यानंतर आसन बालानी यांनी तिला कार्यालयात भेटण्यास बोलावले. तेव्हा ह्या महिलेने आसन बालानी यांना त्यांच्या विम्यात नुकसान होत असून दुप्पट फायदा हवा असल्यास जुना जीवन विमा तोडण्याची मागणी केली.

पॉलिसी तपासली असता पायाखालची जमीनच सरकली

आसन यांनी याला विरोध केला, असे असतानाही त्या दिवशी तिने जुनी विमा पॉलिसी तोडून नवीन जीवन विमा काढला. पूजा बालानी यांनी विरोध करताच जुनी पॉलिसी कंपनीने रद्द केली. त्यानंतर तात्काळ आसन बालानी यांनी त्यांची पॉलिसी तपासली असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

2020 मध्ये संगणकाच्या सिस्टीममधून आसन बालानी यांचा मोबाईल नंबर काढून त्यात मिनू झा यांचा मोबाईल नंबर टाकला. तसेच फोटोही बदलला. त्यानंतर वर्षाला चार लाख रुपयांचा हप्ता असलेले दोन नवीन जीवन विमा काढले. त्याच्या हप्त्याचे पैसे जुन्या जीवन विम्याच्या जमा रक्कममधून वळते केले होते.

तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

या घटनेची चौकशी केल्यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी तीन जणांच्या विरोधात 46 लाख 61 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीसांनी आरोपी मिनू झा या महिलेसह विकास गोंड आणि अनुज मढवी या तीन जणांना अटक केली आहे.

महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.