लिंबोणीच्या झाडामध्ये गांजाची लागवड, पोलिसांनी सुगावा लागला, छापा टाकून 9 लाखांचा गांजा जप्त!
श्रीगोंदा शिवारात पोलिसांनी छापा टाकून एका शेतामध्ये सुमारे ८ लाख ९५ हजार रुपयाचा गांजा जप्त केला आहे. कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंदा पोलिसांनी संयुक्त कारवाई मध्ये हा गांजा जप्त करून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
श्रीगोंदा : श्रीगोंदा शिवारात पोलिसांनी छापा टाकून एका शेतामध्ये सुमारे ८ लाख ९५ हजार रुपयाचा गांजा जप्त केला आहे. कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंदा पोलिसांनी संयुक्त कारवाई मध्ये हा गांजा जप्त करून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
लिंबोणीच्या झाडामध्ये गांजाची लागवड, पोलिसांनी सुगावा लागला
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 तारखेला गुप्त बातमीदारामार्फत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना माहिती मिळाली की, श्रीगोंदा शिवारातील जगताप वस्ती दत्तवाडी लोखंडेवाडीचे मध्ये शेत जमीन गट नंबर ७००, ७०१ यामध्ये लिंबोणीच्या झाडाचे मध्ये गांजाची लागवड केली आहे. सदर माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व पोलीस पथक हे श्रीगोंदा शिवारातील दत्तवाडी लोखंडेवाडीच्या मध्ये जगताप वस्ती या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता या ठिकाणी लिंबोंणीच्या शेतामध्ये गांजाची लहान-मोठी झाडांची लागवड केलेली होती.
छापा टाकून 9 लाखांचा गांजा जप्त!
सदर ठिकाणी छापा टाकून तेथे हजर असणारे दोन इसम यात अरुण हरिभाऊ जगताप ५६ व बाळू हरिभाऊ जगताप वय५९ दोघे राहणार जगताप वस्ती दत्तवाडी लोखंडेवाडीचे मध्ये श्रीगोंदा शिवार अशा दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले यावेळेस पोलीस पथका समवेत कृषी अधिकारी व व्हिडीओ चित्रण त्यांनाही पाचारण करण्यात आले होते. सदर छाप्यात गांजाची लहान-मोठी हिरवेगार पाला असणारी झाडे ताब्यात घेण्यात आली यामध्ये एकूण ८ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस अंमलदार केशव व्हरकटे, सागर जंगम, दादासाहेब टाके,अंकुश ढवळे, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, अमोल कोतकर, गणेश गाडे आदींनी केली आहे.
(Cannabis farming in Ahmednagar Shrigonda Cannabis worth Rs 8 lakh 95 thousand seized)
हे ही वाचा :
दसऱ्याच्या दिवशी एक कोटी 18 लाखांचं ‘सोनं लुटलं’, पुण्यातील चोरटा राजस्थानात जेरबंद
अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, पुण्यात जन्मदात्रीकडून तीन महिन्यांच्या बाळाचा खून