निरागस चिमुरडी घराबाहेर खेळत होती, तेवढ्यात वेगवान कार आली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं..

लहानग्या लेकीला घेऊन सणासाठी आई माहेरी आली होती. चिमुरडी लेक घराबाहेर खेळत असतानाच जोरदार आवाज आला आणि मुलीच्या किंकाळ्यांनी परिसर दुमदुमून गेला. तिची अवस्था पाहून आई तर बेशुद्धच पडली.

निरागस चिमुरडी घराबाहेर खेळत होती, तेवढ्यात वेगवान कार आली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं..
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 12:49 PM

लखनऊ | 14 सप्टेंबर 2023 : रक्षाबंधनाच्या निमित्ताने गुप्ताजींची मुलगी आणि नात घरी आल्यानंतर काही दिवस घरी रहायला आले होते. त्यांच्या येण्याने गुप्ताजींचे घर आनंदून गेले होते. मात्र एका घडलेल्या दुर्घनटनेने त्याचं हसतंखेळतं घर क्षणात दु:खात बुडालं. रस्त्यावर वेगवान कार चालवणाऱ्या एका इसमाच्या बेपर्वाईमुळे गुप्ता कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. वेगवाने कारने रस्त्यावर खेळणाऱ्या चिमुरडीला चिरडलं (car crushed small girl) आणि ती जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात (hospital) नेण्यात आलं खरं पण तेथे तिचा मृत्यू झाला आणि कुटुंबीय दु:खात बुडाले. बाराबांकी येथे हा दुर्दैवी प्रकार घडला (accident) असून संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून आरोपी कारचालकाचा शोध सुरू आहे.

ही दुर्दैवी घटना बाराबांकी येथे घडली. घसियारी मंडी जवळील शुमभ सिनेमागृहासमोर राहणाऱ्या प्रकाश गुप्ता यांच्या लेकीचे, कांचनचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने कांचन आणि तिची अडीच वर्षांची लेक , सृष्टी या दोघी आजी-आजोबांकडे आल्या होत्या. त्यांच्या घराजवळच सिल्वर हाइट्स अपार्टमेंट आहे. बुधवारी रात्रीच्या ८ च्या सुमारास कांचन व सृष्टी रस्त्यावर फेरी मारत होत्या. चिमुरडी सृष्टी तेथे खेळत होती. तेवढ्यात रस्त्यावरून एक कार वेगाने आली आणि सृष्टीला चिरडून पुढे निघून गेली. गंभीर जखमी झालेली सृष्टी रस्त्यावर तशीच पडलेली होती. मात्र कारचालकाने तिची मदत न करता तो तेथून फरार झाला. कुटुंबियांच्या आणि शेजाऱ्यांच्या मदतीने सृष्टीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे तिचा मृ्त्यू झाला.

आई पडली बेशुद्ध आपल्या पोटच्या लेकीला रस्त्यावर तडफडताना बघून, तिची आई कांचन हिची अवस्था बिकट झाली होती. मात्र तिने कुटुंबियांच्या मदतीने कसंबसं सृष्टीला रुग्णालयात नेलं. तेथे उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकताच कांचन हिला मोठा धक्का बसला आणि ती जागीच बेशुद्ध झाली. तर कांचनचे आई-बाब यांचीही रडून-रडून वाईट अवस्था झाली होती. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिस रुग्णालयात पोहोचले व त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कारलचालक हा त्याच भागातील सिल्वर हाइट्स अपार्टमेंटम्धेय रहात असून सध्या फरार झाला आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.