सांगलीत पुराच्या पाण्यात कार वाहून गेली, कार चालक बेपत्ता

परतीच्या पावसाने राज्यभर कहर केला आहे. ग्रामीण भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक दु्र्घटना घडत आहेत.

सांगलीत पुराच्या पाण्यात कार वाहून गेली, कार चालक बेपत्ता
हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत आढळली तरुणीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 10:13 PM

सांगली : पुराच्या पाण्यातून जाताना कार ओढ्यात बुडाल्याची (Car Drowned) घटना शुक्रवारी दुपारी सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरात (Tasagaon City in Sangli District) घडली आहे. कारमधील चालक बेपत्ता (Car Driver Missing) आहे. उत्तम रामराव पाटील असे बेपत्ता कार चालकाचे नाव आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे नद्या, ओढ्यांना पूर आला आहे.

परतीच्या पावसाने राज्यभर कहर केला आहे. ग्रामीण भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक दु्र्घटना घडत आहेत.

पाण्याचा अंदाज न आल्याने कार बुडाली

मुसळधार पावसामुळे तासगाव शहरातील कापूर ओढा दुथडी भरुन वाहत आहे. या ओढ्यावर असलेला पूलही पाण्याखाली गेला आहे. या पुलावरून कार घेऊन जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने कार पाण्यात बुडाली.

हे सुद्धा वाचा

सतत पडणाऱ्या पावसामुळे ओढ्याला पूर

तासगाव शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी येथून तासगाव शहराकडे येण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे. हा रस्ता कापूर ओढ्यातून येतो. ओढ्यात सिमेंटच्या पाईप टाकून कच्चा पूल करण्यात आला आहे. गेले आठ दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने या पुलावरूनही पाणी गेले आहे.

पुलाच्या बाजूला मोठे खड्डे असल्याने तिथे पाणी खोल आहे. वासुंबे येथील उत्तम रामराव पाटील हे आपल्या चारचाकी गाडीतून इंदिरानगरकडून तासगाव शहराकडे येत होते. गाडी पुलावर आल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाण्याचा प्रवाह खूप असल्याने कार पाण्यात बुडाली.

मासेमारी करणाऱ्या मुलाने वाचवण्याचा प्रयत्न केला पण…

यावेळी तेथेच मासेमारी करणाऱ्या मुलाने हात धरून पाटील यांना वर ओढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र कारसह पाटीलही बुडाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील लोकांनी धाव घेत गाडी पाण्यातून बाहेर काढली. मात्र त्यात उत्तम पाटील आढळले नाहीत. सध्या उत्तम पाटील यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.