हॉटेलमधील CCTVने टिपले मृत्यूआधीचे हसरे चेहरे! सातही जणांनी हॉटेलात केक कापला, जेवण केलं

Wardha Medical Collage Student Accident : नागपूर-तुळजापूर महामार्गवरील देवळी समोरील इसापूर जवळील एका हॉटेलमध्ये हे गेले असून तेथील सीसीटीव्ही टीव्ही 9च्या हाती लागले आहे.

हॉटेलमधील CCTVने टिपले मृत्यूआधीचे हसरे चेहरे! सातही जणांनी हॉटेलात केक कापला, जेवण केलं
वर्धा अपघातातील विद्यार्थ्यांचं अपघाताआधीचं सीसीटीव्ही फुटेज समोर
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 6:05 PM

वर्धा : सोमवारी मध्यरात्री वर्धा जिल्ह्याच्या (Wardha Medical Collage Student Accident) सेलसुरा येथे झालेल्या अपघातात सात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतक विद्यार्थी हे नेमके गेले कुठे होते, याबाबत नानाविविध तर्कवितर्क लावले जात होते. मृत सात विद्यार्थ्यापैकी एक असलेल्या पवन शक्ती या विद्यार्थ्याचा सोमवारी दिवशी वाढदिवस (Birthday) होता आणि वाढदिवस साजरा करण्याकरिता सर्व विद्यार्थी बाहेर गेले होते. नागपूर-तुळजापूर महामार्गवरील देवळी समोरील इसापूर जवळील एका हॉटेलमध्ये हे गेले असून तेथील सीसीटीव्ही टीव्ही 9च्या हाती लागले आहे. या हॉटेलमधून निघाल्यानंतर सेलसुरा इथं आल्यानंतर नदीवरील पुलावरुन या विद्यार्थ्यांची कार थेट चाळीस फूट खाली कोसळली होती. या अपघातात सातही विद्यार्थ्यांचा जीव गेला होती. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला होता. सातही विद्यार्थी हे मेडिकलचे विद्यार्थी होते. एमबीबीएसचं शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांच्या मृत्यूआधीचे हसरे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Footage) कैद झाले आहेत. हॉटेलात पोहोचल्यानंतर आणि निघतानाचे व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत.

कुठे गेले होते, तेही कळलं!

इसापूर जवळील हॉटेलमध्ये सातही भावी डॉक्टरांनी जेवण केलं होतं. त्यानंतर हॉटेलमध्ये केक कापून पवन चा वाढदिवस साजरा केला होता. सेलसुरा येथील अपघातात वैद्यकीय महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यूने अख्ख्या देशाला हादरा बसला होता. तिरोडा येथील आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले,नीरज चौहान, नितेश सिंग, विवेक नंदन,प्रत्युश सिंग, शुभम जयस्वाल आणि पवन शक्ती हे नितेश सिंग यांच्या वाहनाने पवन शक्तीचा वाढदिवस साजरा करायला निघाले होते.

सीसीटीव्हीमध्ये काय दिसलं?

अपघाताआधी पवन याचा वाढदिवस साजरा कऱण्यासाठी सातही मेडिकलचे विद्यार्थी हे सर्व सोमवारी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नागपूर तुळजापूर महामार्गवरील इसापूर जवळील माँ की रसोई या हॉटेलमध्ये पोहचले होते. दरम्यान यांच्या हातात केक सुद्धा होता. ते हॉटेलच्या बाजूला असलेल्या गार्डनमध्ये बसले. सुरवातीला केक कापून हॉटेलमध्ये स्नॅक्सची ऑर्डर देत त्याचा आस्वाद घेतला. 11 वाजून 27 मिनिटाने पवन याने 2780 रुपयांचं बिलही ऑनलाईन पद्धतीने भरलं. नंतर रात्री 11 वाजून 38 मिनिटांनी ते येथून निघून गेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आलंय. यानंतर समोर जाऊन त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.

या घटनेनंतर हे सर्व विद्यार्थी नेमके गेले कुठे होते, याबाबत चर्चा सुरु होती. मात्र या सीसीटीव्ही नंतर हे सर्व यवतमाळ जिल्ह्यात नसून वर्धा जिल्ह्यातच गेले असल्याचं समोर आलंय. मंगळवारी संध्याकाळपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे शवविच्छेदन झाले असून मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आलेले आहेत. या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत दुःख व्यक्त केलं होत. तसंत अपघातातील मृतांच्या नातेवाईंकांना आर्थिक मदतीचीही घोषणा केली होती.

संबंधित बातम्या :

रात्रीची वेळ, सामसूम रस्ता, भरधाव कार, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, मंडळ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

उभ्या ट्रकला पाठीमागून धडक, कारचा अक्षरश: चुराडा, तिघांचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रव्हल्सची दुचाकीला धडक, आईसह 4 महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.