CCTV Video : वाढदिवसाचा धिंगाणा बंद करायला लावल्याचा राग, चौघांकडून मध्यरात्री घरावर दगडफेक! घटना CCTV मध्ये कैद

रात्री उशिरापर्यंत वाढदिवसाच्या कार्यक्रमात आरडाओरड सुरु असल्यामुळे शेजारी राहण्यांनी त्यांना रोखलं आणि शांतता राखण्याची विनंती केली. याचाच राग मनात धरत चौघांनी मध्यरात्री घरावर जोरदार दगडफेक केली. हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे.

CCTV Video : वाढदिवसाचा धिंगाणा बंद करायला लावल्याचा राग, चौघांकडून मध्यरात्री घरावर दगडफेक! घटना CCTV मध्ये कैद
नाशिकच्या आडगाव परिसरात तरुणांची दगडफेकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 8:00 PM

नाशिक : वाढदिवस (Birthday) रस्त्यावर साजरा करण्याचं किंवा वाढदिवसाला मोठा धिंगाणा करण्याचं पेव फुटलं आहे. नाशिकच्या आडगाव शिवारातही असाच एक प्रकार समोर आला आहे. रात्री उशिरापर्यंत वाढदिवसाच्या कार्यक्रमात आरडाओरड सुरु असल्यामुळे शेजारी राहण्यांनी त्यांना रोखलं आणि शांतता राखण्याची विनंती केली. याचाच राग मनात धरत चौघांनी मध्यरात्री घरावर जोरदार दगडफेक (Stone Pelting) केली. हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. यात काहीजण दगडफेक करत असल्याचं पाहायला मिळत आहे. एक जण गेटवर चढण्याचाही प्रयत्न करतो. मात्र, त्याला यश येत नाही. दरम्यान, या प्रकाराची तक्रार आडगाव पोलीस (Adgaon Police) ठाण्यात करण्यात आली असून, चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही व्हिडीओत नेमकं काय?

साधारण दीड ते पावणे दोन मिनिटाच्या या व्हिडीओत काही तरुण घरावर दगडफेक करत असताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला एक तरुण दगडफेक करताना त्याची सावली पाहायला मिळते. मात्र, जसा तो थोडा पुढे येतो तेव्हा तो स्पष्टपणे घरावर दगड फेकताना पाहायला मिळत आहे. त्याचवेळी तो घराच्या गेटवर चढून जाण्याचाही प्रयत्न करतो मात्र त्यात त्याला यश येत नाही. मग मागे जात तो पुन्हा एकदा रस्त्यावरील दगड उचलून घराच्या दिशेने फेकतो. बाजूला पडलेली एक बादलीही त्याने घरावर भिरकावली. व्हिडीओच्या शेवटी एका गाडीवर बसून तो तरुण निघून जात असल्याचंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दगडफेकीनंतर आडगाव पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या राऊत मळा, गणेश संकुल, म्हाडा बिल्डिंग शेजारी आडगाव येथे फिर्यादी गणेश शंकर जिंजर्डे आणि संशयित हे शेजारी राहतात. संशयित आरोपी यांच्या घरी रात्री वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता. रात्र जास्त झालेली असताना आणि आरडाओरड सुरू असल्याने फिर्यादी जिंजर्डे यांनी त्यांना आरडाओरड करू नका असे समजून सांगितले. याचा राग आल्याने संशयित अभिषेक, ऋषिकेश, मयूर, प्रतीक, यांनी गणेश जिंजर्डे यांच्या घरावर दगडफेक केली आणि घराचे मोठे नुकसान केले. अशी फिर्याद आडगाव पोलिसांत देण्यात आली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.