केंद्र सरकारचे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे पथक नाशिकमध्ये कशासाठी आले? पथकासोबत आणखी कोण-कोण
पीडित मुलीने आपल्यावर लैंगिग अत्याचार केल्याची बाब आपल्या नातेवाईकांना सांगितली होती, त्यावरून पहिली अत्याचाराची घटना समोर आली होती.
नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ येथील ज्ञानदीप आधार आश्रम लैंगिग अत्याचार प्रकरणी आज नाशिकमध्ये केंद्राचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारचे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या पथकाने ही चौकशी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात नाशिकच्या म्हसरूळ परिसरात बलात्काराची घटना घडली होती. द्विसदसीय पथकाने आज नाशिकमध्ये आधार आश्रमाची पाहणी केली आहे. त्यावेळी सोबत राज्य महिला व बाल विकास आयोगाचेही सदस्य उपस्थित होते. आधार आश्रमाच्या संचालक हर्षल मोरे याने सात विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. एकूणच नाशिकमधील हे संपूर्ण प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. त्याचीच दखल केंद्र सरकारने देखील घेतली असून याबाबत आजच्या दिवशी केंद्राच्या आणि राज्याच्या पथकाने एकत्रित चौकशी केल्याने या प्रकरणात आणखी काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नाशिकमधील म्हसरूळ पोलीस ठाण्यात द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप आधार आश्रम प्रकरणात एकूण सात गुन्हे दाखल केले आहे.
पीडित मुलीने आपल्यावर लैंगिग अत्याचार केल्याची बाब आपल्या नातेवाईकांना सांगितली होती, त्यावरून पहिली अत्याचाराची घटना समोर आली होती.
म्हसरूळ पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल केल्यानंतर नाशिक शहर पोलीसांनी तपास सुरू केला होता त्यामध्ये आणखी सहा अत्याचारच्या घटना समोर आल्या होत्या.
महाराष्ट्राच्या महिला बाल कल्याण विभागाने याबाबत दखल घेऊन सात दिवसांच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यातच आता केंद्राच्या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या पथकाने ही चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणामुळे आधार आश्रमाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.