चंद्रपूरमध्ये बर्निंग कारचा थरार, काही मिनिंटामध्ये होत्याचं नव्हतं, पाहा व्हिडीओ

सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरु असताना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रपुढे पार्क केलेली मारूती ब्रेजा गाडी पेटली.

चंद्रपूरमध्ये बर्निंग कारचा थरार, काही मिनिंटामध्ये होत्याचं नव्हतं, पाहा व्हिडीओ
चंद्रपूरमध्ये बर्निंग कार
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 9:30 AM

चंद्रपूर: सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरु असताना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रपुढे पार्क केलेली मारूती ब्रेजा गाडी पेटली. कारमधील व्यक्ती वैयक्तिक कामामुळं रुग्णालयात गेल्यानं जीवितहानी टळली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं. मात्र, तोपर्यंत गाडीचं मोठं नुकसान झालं होतं.

आगीचं कारण अस्पष्ट

ब्रेझा कार मधील व्यक्ती नजीकच्या दवाखान्यात गेली होती. तितक्यात गाडीला आग लागली आणि बघता बघता आगीन रौद्र रुप धारण केलं. बल्लारपूर नगरपालिकेच्या अग्निशामन पथकाने सूचना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलानं तातडीने कारवाई करत आग विझवली. मात्र, तोपर्यंत गाडीची मोठी हानी झाली होती. चार चाकी गाडीला आग का लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

बल्लारपूरात बर्निंग कारचा थरार

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरात बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. बँक ऑफ महाराष्ट्र बँकेपुढे पार्क केलेली मारूती ब्रेजा गाडी पेटली. कार मधील व्यक्ती नजीकच्या दवाखान्यात गेल्याने जीवितहानी झालेली नाही. बल्लारपूर नगरपालिकेच्या अग्निशामन पथकाने सूचना मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

ही कार गिरीश नावाच्या व्यक्तीची असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुलासंह तो दवाखान्यात गेला होता. दवाखान्यातून परत आल्यावर पाहिलं असता कारला आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. कारला आग लागलेल्या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी गर्दी कमी करण्याचं आवाहन केलं होतं.

इतर बातम्या:

नागपूरमध्ये मध्यरात्री गुंडाच्या हत्येचा थरार, घराबाहेर बसल्याच्या कारणावरुन वादाचा भडका, नेमकं काय घडलं?

Hair Care Tips : ‘या’ बियांचा आहारात समावेश करा आणि चमकदार केस मिळवा!

Chandrapur Ballarpur Burning car due to fire video viral

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.