चंद्रपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यात नवनवे खुलासे, ग्राहक हादरले, अफरातफर करणारा रोखपाल मोकाट?

दोन दिवसांच्या सुट्टीनंतर बँक सुरू होताच अनेक ग्राहकांनी बँकेत धाव घेत आपले खाते तपासल्यानंतर त्यांना धक्का बसला. Chandrapur DCC Bank Cashier Fraud

चंद्रपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यात नवनवे खुलासे, ग्राहक हादरले, अफरातफर करणारा रोखपाल मोकाट?
चंद्रपूर जिल्हा बँक
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 7:10 PM

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणात नवे खुलासे होत आहेत. चंद्रपूर शहर शाखेत रोखपाल निखील घाटे याने सुमारे दीड कोटींच्या रकमेची अफरातफर केल्याचं समोर आलं आहे. शनिवारी समोर आलेले हे प्रकरण 5 कोटींच्या पुढे असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे, दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बँक सुरू होताच अनेक ग्राहकांनी बँकेत धाव घेतली. ग्राहकांनी खातं तपासले असता अनेक खात्यात पैसे टाकलेच नसल्याचा गंभीर प्रकार पुढे आलाय.( Chandrapur District Bank City Branch Cashier money misuse case reviled new facts)

फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शहर शाखेत रोखपाल घाटे द्वारे फसवल्या गेलेल्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. आता ग्राहकांच्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत. यासाठी बँकेत एक अधिकारी नियुक्त केला असून, तो या तक्रारी स्वीकारत आहे. तक्रारी देण्यासाठी मोठी रांग बँकेत लागली असून, यात वैयक्तिक आणि सहकारी सोसायट्यांच्या समावेश आहे.

ग्राहकांचे पैसे घाटेकडून लंपास

ग्राहकांनी त्यांच्या खात्यात भरण्यासाठी दिलेले पैसे रोखपाल घाटे याने स्वतःच लंपास केले. मागील शुक्रवारी जेव्हा एका सोसायटीने मुख्यालयाकडे तक्रार केली, तेव्हा या घोटाळ्याचं बिंग फुटलं. शनिवारपासून या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू झाली तेव्हा आकडा सव्वा कोटीच्या पुढे आला होता. पण, आज (सोमवार दि. 15 फेब्रुवारी) सकाळपासून सुरू झालेला तक्रारींचा ओघ बघता हा घोटाळा आणखी मोठा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज अनेक ग्राहकांनी आपल्या खात्याची शहानिशा करण्यासाठी धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार काही तासात घोटाळ्याचा आकडा आणखी 55 लाखांनी पुढे गेला होता. हा आकडा केवळ काही तासांचा आहे, हे विशेष. ग्रामीण भागातून ग्राहक, सभासद शेतकरी, सहकारी सोसायट्या आणि ग्रामपंचायतीचे कारभारी तक्रारी घेऊन येत आहेत. या शाखेतील सुमारे 1700 ग्राहकांना बँकेने मोबाईलवरून मेसेज पाठवले असून, हे सर्व ग्राहक आल्यावर खरा आकडा समोर येण्याची शक्यता आहे. पण या घोटाळ्याने सर्वसामान्य ग्राहक आणि शेतकरी मात्र पुरता हादरला आहे. आपले हक्काचे पैसे मिळणार की नाही, या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.

बँकेकडून रोखपालाला वाचवण्याचा प्रयत्न?

रोखपालानं केलेल्या अपहार प्रकरणी बँकेने रविवारी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर 420 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पण, अजूनपर्यंत मुख्य आरोपी असलेला बँकेचा रोखपाल निखिल घाटे याला अटक झालेली नाही. बँकेकडून त्याचे निलंबनही झालेले नाही. त्यामुळे या घोटाळेबाजाला वाचवण्याचे प्रयत्न तर होत नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली जातेय.

दरम्यान, बँकेने ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेसमोरील या बँक शाखेत एक अधिकारी नियुक्त केला असून, ग्राहकांना मोबाईलवर मेसेज पाठवले असल्याची माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोटे यांनी दिली.

आरोपी रोखपाल घाटे याने अफरातफर केलेल्या पैशांचा वापर आयपीएलवरील सट्टा खेळण्यासाठी, ओळखीच्या लोकांना व्याजाने देण्यासाठी वापरल्याची माहिती पुढे येत आहे. पण एवढ्या मोठ्या रकमेची अफरातफर एक सामान्य कर्मचारी कुणाचे पाठबळ असल्याशिवाय कसा करू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

संबंधित बातम्या :

मिनिटांत कर्ज देणाऱ्या अ‍ॅपमुळे अनेकांनी केली आत्महत्या, RBI ने केलं अलर्ट

आता जिल्हा बँकेमध्येही महाविकास आघाडी पॅटर्न, मात्र, ‘या’ जिल्ह्यात काँग्रेस मोठा भाऊ

(Chandrapur District Bank City Branch Cashier money misuse case reviled new facts)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.