Chandrapur Fire : चंद्रपूरची आग अटोक्यात येईना, आता पेट्रोल पंपही आगीच्या विळख्यात, 20 किमी अंतरावरून दिसताहेत आगीचे लोळ

बल्लारपूर पेपर मिलच्या मालकीचा हा डेपो आहे. हा लाकूड साठवण डेपो सुमारे 20 किमी दूर असून चंद्रपूर शहरातून आगीचे लोळ दिसत आहेत. अग्निशमन बंबांच्या अथक प्रयत्नांनंतर देखील आग पेट्रोल पंपापर्यंत पोहोचली आहे.

Chandrapur Fire : चंद्रपूरची आग अटोक्यात येईना, आता पेट्रोल पंपही आगीच्या विळख्यात, 20 किमी अंतरावरून दिसताहेत आगीचे लोळ
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 9:16 PM

चंद्रपूर : चंद्रपुरात लागलेल्या आगीबाबात (Chadrapur Fire) एक मोठी अपडेट आलीय. बल्लारपूर शहरालगत कळमना येथे लागलेल्या आगीत शेजारचा एचपीसीएल पेट्रोल पंप (Petrol Pump Fire)  विळख्यात आला आहे. लाखो टन सुबाभूळ- बांबू- निलगिरीचे लाकूड साठवण डेपो (Fire Brigade)आहे आणि याच डेपोत आग लागली आहे, बल्लारपूर पेपर मिलच्या मालकीचा हा डेपो आहे. हा लाकूड साठवण डेपो सुमारे 20 किमी दूर असून चंद्रपूर शहरातून आगीचे लोळ दिसत आहेत. अग्निशमन बंबांच्या अथक प्रयत्नांनंतर देखील आग पेट्रोल पंपापर्यंत पोचली आहे. पेपर मिल- चंद्रपूर मनपा- बल्लारपूर न.प., भद्रावती न.प.-चंद्रपूर वीज केंद्र-घुग्गुस येथून अग्निशमन बंब घटनास्थळी बोलवण्यात आले आहेत. तरीही ही आग विझेना झालीय. या आगीने अग्निशमन दलाच्याही आता नकीनऊ आणले आहेत. कित्येक तासांपासून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भीषण आगीचा व्हिडिओ

नेमका कुठे आहे हा डेपो?

आष्टी मार्गावरील बल्लारपूर पेपर मिलच्या लाकूड साठवण डेपो आहे. सहाजिकच या डेपोत सुक्या लाकडाचा साठा मोठ्या प्रमणात असतो, आणि सुक्या लाकडाने एकदा पेट घेतला तर त्याला विझवणे अतिशय कठीण जाते. आता तिच परिस्थिती चंद्रपुरात उद्भवली आहे. यातूनच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दुपारी लागलेल्या आगीत संपूर्ण डेपो आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याची माहिती लोकांकडून दिली गेली आहे.. अगदी महामार्गलगत असलेल्या या लाकूड डेपोच्या आगीच्या ज्वाळा कित्येक किलोमीटर दुरून दिसत आहेत, त्यामुळे या मार्गावारील वाहतूकही दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पंपावर स्फोट होण्याची शक्यता

आता या आगीने पेट्रोल पंपाला विळखा घातल्याने धोका आणखी वाढला आहे. ही आग पेट्रोल पंपावर स्फोट घडवण्याचीही भिती आता व्यक्त करण्यात येत आहे. असे झाल्यास आणखी लाखोंच्या नुकसानीला समारे जावे लागणार आहे. या आगीची दाहकता या आगीच्या व्हिडिओतूनही स्पष्ट दिसून येत आहे. बल्लारपूर पेपर मिलचा लगदा तयार करण्यासाठी लागणारा निलगिरी- सुभाबुळ-बांबू असा कच्चामाल याच ठिकाणी उघड्यावर साठविला जातो, त्या ठिकाणीची हा भयानक प्रकार घडला आहे. आता ही आग अटोक्यात आणण्यासाठी अनेक ठिकाणाहून मदत मागवली जात आहे. अनेक ठिकाणाहून मदत पोहोचलीही आहे. मात्र तरीही आग अटोक्यात आलेली नाही. अजून ही आग किती नुकासान करणार आणि आतापर्यंत किती नुकसान केलं आहे. हे आग विझल्यानंतरच कळेल.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.