डोक्यात बाटली फोडून राहुलचा गळा दाबला! श्वास थांबताच हातपाय सेलोटेपने चिटकवले, चंद्रपुरात हॉरर हत्याकांड

Chandrapur Murder News : मृतक राहूल ठग या युवकाचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय

डोक्यात बाटली फोडून राहुलचा गळा दाबला! श्वास थांबताच हातपाय सेलोटेपने चिटकवले, चंद्रपुरात हॉरर हत्याकांड
धक्कादायक हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 11:25 AM

चंद्रपूर : चंद्रपुरात (Chandrapur Murder) एका तरुणाची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह एका इमारतीच्या टॅरेसवर आढलून आला होता. हा मृतदेह निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या हत्याकांड प्रकऱणी पोलिसांनी (Chandrapur Police News)  खळबळजनक खुलासा केलाय. या तरुणाच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर वार करण्यात आले होते. गळा दाबून आधी या तरुणाचा जीव घेण्यात आला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे हात आणि पाय सेलोटेपचे चिटकवण्यात आले असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केलाय. चंद्रपूर (Chandrapur news) पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका शाळेच्या शासकीय इमारतीच्या छतावर 28 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबतची माहिती पोलिसांनी देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर माहिती दिली आहे. पोलिसांच्या तपासातून धक्कादायक खुलासे करण्यात आलेत.

नेमकं काय घडलं?

चंद्रपूर शहराच्या मध्यभागी ज्यूबली शाळेच्या आवारात एका शासकीय इमारतीच्या छतावर मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह राहुल ठक या 28 वर्षांच्या तरुणाचा होता. राजूरा येथे राहणाऱ्या या युवकाचा खून करण्यात आला होता. राहुलच्या मृतदेहावरील डोक्यावर आणि मानेवर घाव आढळून आले होते. दारुची बाटली डोक्यावर मारून, गळा दाबून राहुलची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. राहुलची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे राहुलचे हात-पाय सेलोटेपने चिटकवण्यात आले होते.

तपास सुरु

चंद्रपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलाय. तसंच राहुलचा मृतदेह शवविच्छेदनाला पाठवण्यात आलाय. या घटनेचे गांभीर्य बघता शहर पोलिसांनी तपासही तातडीनं सुरू केलाय.

हे सुद्धा वाचा

अनैतिक संबंध होते म्हणून हत्या?

मृतक राहूल ठग या युवकाचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. मारेकरी मागील एक वर्षांपासून त्याच्या मागावर होते. याआधीही त्याला मारहाण करण्यात आली होती. पण त्याच्या हत्येचा कट जुळत नव्हता, अशीही माहिती पोलिसांनी दिलीय. मात्र यावेळी आरोपीने पूर्वनियोजित कट रचून राहुलचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठीही तयारी केली होती.

राहुलचा खून करण्यात आला त्यानंतर त्याचे हात व पाय टेपने बांधण्यात आले होते. कदाचित त्याचा मृतदेह एखाद्या अज्ञात स्थळी फेकण्याची आरोपीची तयारी असावी, असा संशयही व्यक्त केला जातोय. या हत्याकांडप्रकरणी आरोपी एकटा नसून एकूण तीन आरोपींनी मिळून ही हत्या केली आहे. सध्या आरोपींच्या मागावर पोलीस असून लवकरच मारेकऱ्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.