मित्रांसोबत पार्टीला जाण्यासाठी घराबाहेर, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा 28 दिवसांनंतर मृतदेह सापडला
शुभम फुटाणेचे 30 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करत असल्याचा मेसेज 16 जानेवारी रोजी त्याच्या कुटुंबियांना आला होता. (Chandrapur Youth Kidnap Murder)
चंद्रपूर : मित्रांसोबत पार्टीला जाण्यासाठी निघालेल्या तरुणाचा मृतदेह 28 दिवसांनंतर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तीस लाखांच्या खंडणीसाठी चंद्रपुरातील तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. मात्र तरुणाच्या सुटकेच्या आशेने डोळे लावून बसले असताना, जवळपास महिन्याभरानंतर त्याचा अर्धवट मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Chandrapur Youth Kidnap and Murder Case)
मित्रांसोबत पार्टीला जाण्यासाठी घराबाहेर
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात राहणाऱ्या शुभम फुटाणे या तरुणाचे 28 दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. शुभम अमरावतीमध्ये अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. मित्रांसोबत पार्टीला जात असल्याचं कारण सांगून शुभम 16 जानेवारीला घरुन निघाला होता.
शुभमच्या अपहरणाचा कुटुंबीयांना मेसेज
शुभम फुटाणेचे 30 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करत असल्याचा मेसेज 16 जानेवारी रोजी त्याच्या कुटुंबियांना आला होता. त्याची बाईकही घुग्गुस शहरातच रस्त्याच्या कडेला आढळली होती.
शुभमचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत
चंद्रपूर पोलीस गेले काही दिवस अपहरणाबाबत अंधारात होते. स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व दावे सपशेल अपयशी ठरले आहेत. घुग्गुस शहरातील शांतीनगर लेआउटमध्ये केवळ कवटी शाबूत असलेला अर्धवट जळालेला मृतदेह शनिवारी आढळला होता. त्यावरुन शुभम फुटाणेची ओळख पटवण्यात आली होती.
जुन्या अपहरण प्रकरणातील आरोपी अटकेत
विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात 6 वर्षांच्या बालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. या मुलाच्या अपहरणाच्या प्रयत्नात अटक झालेला आरोपी गणेश पिंपळशेंडे यालाच पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपूर पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी आणि मयत शुभम यांच्यात काय कनेक्शन होते, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. (Chandrapur Youth Kidnap and Murder Case)
व्यसनीपणाला कंटाळून आई-मुलाकडून बापाच्या खुनाची सुपारी
व्यसनाधीन झालेल्या पित्याला कंटाळलेल्या मुलाने आपल्या आईच्या मदतीने सुपारी देऊन पित्याचा खून केल्याची घटना तब्बल दीड वर्षानंतर उघडकीस आली आहे. 14 ऑगस्ट 2019 रोजी नांदेड शहरातील सरपंच नगर भागात शरद कुऱ्हाडे नावाच्या इसमाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात सापडला होता. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात कुऱ्हाडे यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली होती. परंतु संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर शरद कुऱ्हाडे यांच्या आत्महत्येचा बनाव उघड झाला.
संबंधित बातम्या :
महिलेला फेसबुकवरील मैत्री महागात, गोड बोलून नायजेरियन नागरिकाकडून साडे दहा लाखांचा गंडा
सांगलीत हवेत गोळीबार, डोळ्यात चटणी टाकून चौघांवर तलवार-कोयत्याने वार
(Chandrapur Youth Kidnap and Murder Case)