बनावट सोने गहाण ठेवून चक्क बँकेला गंडा, जिल्हा बॅंकेची 13 लाखांची फसवणूक

हे कर्ज देताना त्यांच्याकडून जे सोने बँकेत गहाण ठेवण्यात आलं होतं. त्याची तपासणी देखील करण्यात आली होती. बँकेचे मूल्यांकन करणारे सराफ संजय सावंत यांच्याकडून सोने चोख असल्याचे प्रमाणपत्र देखील या सात जणांनी आणले होते.

बनावट सोने गहाण ठेवून चक्क बँकेला गंडा, जिल्हा बॅंकेची 13 लाखांची फसवणूक
बनावट सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 3:21 PM

सांगली / शंकर देवकुळे (प्रतिनिधी) : बनावट सोने गहाण ठेवून तब्बल 13 लाखांचे कर्ज घेऊन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सांगली मध्ये घडला आहे.जत तालुक्यातील माडग्याळ येथील जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.माडग्याळ या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत दागिन्यांचे क्रॉस मूल्यांकन दरम्यान हे बनावट सोने असल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर बँकेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत उमदी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रमाणे माडग्याळ येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये श्रीकांत गोविंद हुवाळे, दिलीप सुखदेव सावंत, मच्छिंद्र शाहू सावंत, धुंडापा गावडे, शहाजी मारुती तुराई, अंकुश घोदे, सिद्धू शिंदे आणि मूल्यांकन करणारे सुवर्णकार संजय सावंत अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बँकेच्या विभागीय अधिकाऱ्यांकडून पोलिसात तक्रार दाखल

या आठ जणांच्या विरोधात बँकेची बनावट सोने ठेवून 13 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र नाटेकर यांनी उमदी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.

हे सुद्धा वाचा

सोने गहाण ठेवून कर्ज घेतले

वरीलपैकी सात जणांनी बँकेकडे सोने गहाण ठेवून कर्जाची मागणी केली होती. त्यानुसार सात जणांना 13 लाख 21 हजारांची कर्जाऊ रक्कम सोने तारण कर्ज म्हणून दिलं होतं.

सोने चोख असल्याचे प्रमाणपत्रही आणले

हे कर्ज देताना त्यांच्याकडून जे सोने बँकेत गहाण ठेवण्यात आलं होतं. त्याची तपासणी देखील करण्यात आली होती. बँकेचे मूल्यांकन करणारे सराफ संजय सावंत यांच्याकडून सोने चोख असल्याचे प्रमाणपत्र देखील या सात जणांनी आणले होते.

क्रॉस पडताळणीत सोने बनावट असल्याचे उघड

दरम्यान जिल्हा बँकेने सोने जिन्नस क्रॉस पडताळणी करता श्रीशैल्य आरगोडी यांच्याकडे नऊ दागिने दिले असता, ते दागिने बनावट असल्याचे समोर आले. दरम्यान याबाबत शाखेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेकडे पत्र व्यवहार करण्यात आला.

यानंतर याबाबत परिसरात तक्रार दाखल करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. त्यानुसार आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.