AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

first fir under new law: देशात आजपासून लागू झाले तीन नवीन कायदे, राज्यात पहिला गुन्हा या शहरात

first fir under new law: छत्रपती संभाजीनगर शहरात बलात्कार प्रकरणात कलम 64 नुसार राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. आधीच्या 376 ऐवजी कलम 64 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात डिसेंबर 2023 मध्ये संसदेने या नव्या कायद्यांना मंजुरी दिली होती.

first fir under new law: देशात आजपासून लागू झाले तीन नवीन कायदे,  राज्यात पहिला गुन्हा या शहरात
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 12:43 PM

देशात आजपासून ३ नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत. हे तीन नवे कायदे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियमन आहे. संसदेत नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कायद्यामध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. जुन्या भारतीय दंड संहितामध्ये 511 कलम होती मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेत 358 कलमे आहेत. आता फसवणुकीसाठी आता कलम 420 नाही तर 316 कलम वापरले जाणार आहे. खुनासाठी कलम 302 ऐवजी आता 101 वापरले जाणार आहेत. नवीन कायद्यानुसार छत्रपती संभाजीनगर शहरात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. संभाजीनगर शहरातील एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तसेच देशात पहिला गुन्हा नवी दिल्लीत दाखल झाला आहे.

नवीन कायद्यानुसार कठोर शिक्षा

छत्रपती संभाजीनगर शहरात बलात्कार प्रकरणात कलम 64 नुसार राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. आधीच्या 376 ऐवजी कलम 64 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात डिसेंबर 2023 मध्ये संसदेने या नव्या कायद्यांना मंजुरी दिली होती. सरकारने मंजूर केलेले या कायद्यांना देशभरात अनेक राजकीय पक्षांसह वकील आणि इतर संघटनांनी मोठा विरोध केला होता. नव्याने तयार करण्यात आलेल्या या कायद्यांमध्ये अनेक कठोर शिक्षा असून त्यामुळे गुन्हेगारांवर चाप बसेल, असा दावा सरकारकडून करण्यात आला होता. तसेच नवीन कायद्यामुळे न्यायालयीन व्यवस्थेत बदलांसह तांत्रिक बदल केले आहे.

हे सुद्धा वाचा

नवीन कायद्यांना विरोधकांकडून विरोध करण्यात आला. हे कायदे घाई घाईत मंजूर करून लागू केल्याचा आरोप विरोधकांनी केला.

देशातील पहिला गुन्हा दिल्लीत

नवीन कायद्यानुसार राज्यातील पहिला गुन्हा छत्रपती संभाजीनगरात दाखल झाला. देशात हा गुन्हा नवी दिल्लीत दाखल झाला. दिल्लीत रेल्वे स्टेशनवर पुलाखाली अवैध पद्धतीने विक्री करणाऱ्या वेंडरवर गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे कायद्यात बदल

  • फौजदारी प्रकरणांमध्ये, सुनावणी संपल्यापासून ४५ दिवसांत निर्णय येईल.
  • पहिल्या सुनावणीच्या ६० दिवसांच्या आत आरोप निश्चित केले जातील.
  • 3 वर्षांत कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून देणे हे उद्दिष्ट आहे.
  • अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी कोणीही दोषी आढळल्यास त्याला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा दिली जाईल.
  • सामूहिक अत्याचारासाठी दोषी ठरलेल्यांना 20 वर्षांपर्यंत कारावास किंवा तो आरोपी जिवंत असेपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
  • राजद्रोह आता देशद्रोह होईल.
  • आधी 302 असलेले हत्येचे कलम आता 101 होणार आहे.
  • एखाद्या खटल्यात अटक झाल्यास पोलिसांना त्याच्या कुटुंबियांना कळवावे लागेल, पूर्वी हे आवश्यक नव्हते.
  • काहीही झाले तरी पोलीस 90 दिवसांत पीडितांना काय घडले याची माहिती देतील.
  • जर आरोपी 90 दिवसांच्या आत कोर्टात हजर झाला नाही तर त्याच्या अनुपस्थितीतही खटला चालवला जाईल.
  • आरोपी आणि पीडित दोघांना 14 दिवसांच्या आत एफआयआर, पोलिस रिपोर्ट, चार्जशीटची प्रत मिळवण्याचा अधिकार आहे.
  • खटला संपल्यानंतर न्यायाधीशांना 43 दिवसांत निर्णय द्यावा लागेल.
  • निर्णयानंतर 7 दिवसांच्या आत शिक्षा सुनावायची आहे.
  • महिला आणि बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांचा नवा अध्याय कायद्यात जोडला गेला आहे. यामध्ये मुलाची खरेदी किंवा विक्री करणे हा मोठा गुन्हा मानला जातो. यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे.
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.