Crime News | बालक चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, गणपती विसर्जन काळात…
गणपती विसर्जन काळात गर्दीचा फायदा घेत मुलं चोरणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यांच्याकडून विविध गुन्ह्याचा शोध लागण्याची शक्यता आहे.
कुरार : कुरार पोलिसांनी (Kurar police) बालचोरी टोळीतील ६ आरोपींना अटक केली आहे. जे लहान मुलांची चोरी करून ज्यांना मुलं नसतील, त्यांना विकायचे. मालाडच्या (malad) कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत 28 सप्टेंबर रोजी टाइम्स ऑफ इंडिया ब्रिजखाली झोपलेल्या एका 2 वर्षाच्या मुलाची रात्री तीनच्या सुमारास चोरी झाली होती. त्याच दिवशी 11 दिवसचा गणपती बाप्पाचे विसर्जन होते. याचा फायदा घेत आरोपींनी मूल चोरले असल्याचे पोलिसांच्या (mumbai police) तपासात उघड झाले आहे.
पोलिसांच्या भीतीने आरोपीने मुलाला सोडून दिले
कुरार पोलिसांनी घटनेची नोंद करून सूत्रे आणि सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला. १२ तास उलटल्यानंतर दादर रेल्वे स्थानकावर मुलगी सापडली. मुलगी सापडल्यानंतर कुरार पोलिसांनी मालवणी येथून ४ आरोपींना अटक केली. एका आरोपीला मुलुंड आणि दुसऱ्याला नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या भीतीने आरोपीने मुलाला दादर रेल्वे स्थानकावर सोडून दिल्याचे तपासात समोर आले आहे.
मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल
पोलीस तपासात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. त्याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. कुरार पोलिसांनी इरफान फुरखान खान (२६), सलाहुद्दित नूरमोहम्मद सय्यद (२३), आदिल शेख खान (१९), तौफिर इक्बाल सय्यद (२६), रझा अस्लम शेख (२५) आणि समाधान जगताप (३५) यांना अटक केली आहे. हे आरोपी एक ते दोन वर्षांच्या मुलांची चोरी करून लाखो रुपयांना लोकांना विकायचे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.