सरकारी संस्थेत नोकरी लावतो सांगत पैसे लुटायचा, अखेर ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

सरकारी नोकरीत रुची असणाऱ्या गरजूंना हेरायचा. मग नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लुटायचा. अखेर पर्दाफाश झालाच.

सरकारी संस्थेत नोकरी लावतो सांगत पैसे लुटायचा, अखेर 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात
सरकारी नोकरीच्या नावाखाली लाखोंची फसवणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 8:31 PM

भाईंदर : नामांकित सरकारी संस्थांमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अजितकुमार डे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अजितकुमार विरोधात उत्तन सागरी पोलीस ठाणे आणि नवघर पोलीस ठाण्यात कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीच्या नावाखाली घेण्यात आलेली रक्कम लाखांमध्ये असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

नोकरीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

अजितकुमार डे हा लोकांना भेटून त्यांना नामांकित सरकारी संस्थांमध्ये जलविभाग येथे लॅबॉट्री सीनियर टेक्निशियन, रेल्वे तिकीट क्लर्क, दिल्ली येथे DRDO मध्ये नोकरी, पर्सनल सेक्रेटरी, रेल्वे टीसी म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष द्यायचा. नोकरी लावण्यासाठी लोकांकडून लाखो रुपये घेत त्यांची सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक करत होता. पैसे देऊन देखील नोकरीचे काम होत नसल्याने डे याच्यावर संशय आला. त्याच्या विरोधात उत्तन आणि नवघर पोलीस ठाण्यात सरकारी नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरीच्या नावे फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन

तक्रार दाखल झाल्यानंतर त्याला उत्तन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर अगोदर गुजरात, औरंगाबादमध्ये देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकांनी सरकारी नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून सावधान रहावे. सरकारी नोकर भरती पारदर्शक रित्या करण्यात येते. त्यामुळे कोणाचीही फसवणूक केली जात असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी, असे आवाहन परिमंडळ 1 चे उपायुक्त जयंत बजबळे यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.