Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन वाझे चेकमेट, CIU मधील अधिकारी माफीचा साक्षीदार होणार?

सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून रियाझ काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करुन आणल्या होत्या | Sachin Vaze Riyaz Kazi

सचिन वाझे चेकमेट,  CIU मधील अधिकारी माफीचा साक्षीदार होणार?
रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे CIU मधील निकटचे सहकारी होते.
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 4:22 PM

मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करण्यास नकार देणारे API सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा खेळ आता संपण्याची चिन्हे आहेत. कारण आता सचिन वाझे प्रमुख असलेल्या गुप्तवार्ता विभागातील (CIU) अधिकारी रियाझ काझी यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Riyaz Kazi would be NIA witness in Mansukh Hiren death case)

रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे CIU मधील निकटचे सहकारी होते. सचिन वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणाच्या केलेल्या तपासात ते सहभागी होती. याशिवाय, सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून रियाझ काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करुन आणल्या होत्या. याशिवाय, सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीची सीसीटीव्ही फुटेजही रियाझ काझी यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे रियाझ काझी यांना अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातील जवळपास सर्व घटनाक्रम माहिती आहे. त्यामुळे ते माफीचा साक्षीदार झाल्यास सचिन वाझे यांचा कृत्यांचा पर्दाफाश होणार आहे.

रियाझ काझी आणि API होवाळे ‘एनआयए’च्या रडारवर

सचिन वाझे यांना ताब्यात घेतल्यावर NIA ने लगेच रियाझ काझी यांच्या चौकशीला सुरुवात केली होती. त्यांनी सलग तीन दिवस चौकशीसाठी बोलवण्यात आले. या तिन्ही दिवशी त्यांची जवळपास 10 तास चौकशी झाली होती. मात्र, गुरुवारी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही. आतापर्यंतच्या चौकशीत रियाझ काझी यांनी आपला जबाब नोंदवला आहे. यामध्ये सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून केलेल्या गोष्टींची कबुली रियाझ काझी यांनी दिली आहे. हा सगळा घटनाक्रमक पाहता याप्रकरणात रियाझ काझी माफीचे साक्षीदार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

‘सचिन वाझेंमुळे ‘मातोश्री’ अडचणीत, त्यांची हत्या होऊ शकते’

सचिन वाझे यांच्यामुळे ‘मातोश्री’ अडचणीत आली आहे. त्यामुळे सचिन वाझे (Sachin Vaze) यांचीही हिरेन मनसुखप्रमाणे हत्या होऊ शकते. सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित नाही, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. आगामी काळात सचिन वाझे प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त पोलीस आयुक्तांना दूर करून हे प्रकरण संपणार नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभवती फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र, त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांचाही हत्या केली जाण्याची शक्यता आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.

संबंधित बातम्या:

Sachin Vaze : गुन्ह्यात वापरलेला दुसरा शर्टही मिळाला, जिथे शर्ट जाळला, तिथे नेऊन वाझेंची चौकशी

आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका; निष्पक्ष चौकशीसाठी पोलीस आयुक्तांची बदली: अनिल देशमुख

‘सचिन वाझेंमुळे ‘मातोश्री’ अडचणीत, त्यांची हत्या होऊ शकते; मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा’

(Riyaz Kazi would be NIA witness in Mansukh Hiren death case)

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.